रणविजय सिंग सिंघा हा एमटीव्ही रोडिज आणि ‘स्प्लिट्सविला’ या शोचे होस्ट देशातील पहिले रोडीज मानला जातो. सर्वसाधारण आर्मीचे बॅकग्राउंड असलेल्या फॅमिलीमधील असल्याने रणविजय देखील त्याच्या वडिलांप्रमाणे आर्मीमध्ये जाणार होता. परंतु त्याच्या नशिबात हे वेगळे लिहिले असल्याने त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. अशातच आज (१६ मार्च) गुरुवार रोजी तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबत काही गोष्टी.
रणविजयचा जन्म १६ मार्च १९८३ साली झाला. त्याचे वडील आर्मी ऑफिसर असल्याने त्याने देखील तोच मार्ग निवडला होता. त्याने लेखी परीक्षा आणि मेडिकल देखील क्लिअर केले होते. यातच त्याने रोडीजसाठी ऑडिशन दिले.( Ranvijay singh celebrate his birthday, let’s know about his journey)
View this post on Instagram
त्याने हा शो जिंकून देशभरात त्याचा डंका मिरवला. तरुण प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ जबरदस्त होती. खास करून तरुण वर्ग हा शो फॉलो करतो. या शोमधील त्याचा परफॉर्मन्स पाहून सगळेच प्रभावित झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला पसंती मिळाली.
त्यानंतर तो फेमस सेलिब्रिटी झाला. या शोनंतर रणविजयला रोडिजचा होस्ट केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. नुकतेच तो टेलिव्हिजनवरील शो ‘शार्क टॅंक’मध्ये एक होस्ट म्हणून दिसला होता. मागील काही दिवसात त्याचे रोडिजसोबत नाते तुटले आहे. अशा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होत्या.
View this post on Instagram
रणविजयने काही चित्रपटात देखील काम केले आहे. ‘लंडन ड्रीम’, ‘मोड’, ‘३ एम’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे. चित्रपटासोबत त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याने बॉलिवूडसोबत पंजाबी चित्रपटात देखील काम केले आहे. ‘धरती’, ‘साडी लव्ह स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे. त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या पत्नीचे नाव प्रियांका वोहरा हे आहे. त्यांना एक छोटी गोड मुलगी देखील आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, कलाकारांकडून काळजी घेण्याचं आवाहन
‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली….,










