Tuesday, March 5, 2024

‘ऍनिमल’च्या सीक्वलवर रश्मिकाचा खुलासा; संदिप वांगाबद्दल म्हणाली,’ तो माणूस…’

रश्मिका मंदाना (Rashmika mandana)गतवर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या ऍनिमल या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रणबीर कपूरच्या पत्नी गितांजलीचा रोल केला होता. चित्रपटाने देशांतर्गत आणि जगभरातील बाॅक्स ऑफिसवर भरगोस कमाई केली आहे. बाॅक्स ऑफिसवरील अनेक रेकाॅर्डही या चित्रपटाने मोडले आहेत. रणबीर आणि रश्मिका यांच्या अभिनयाचे आणि संदिप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाचेही चाहत्यांकडून भरपूर कौतुक केले गेले. परंतू हा चित्रपट तितकाच वादातही होता. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला स्त्री विरोधी म्हटले तर काहींंनी हिंसात्मक चित्रपट असल्याचेही सांगितले. आता याबाबतीत चित्रपटातील मुख्य- अभिनेत्री रश्मिकाने तिची प्रतिक्रिया मांडली आहे.

ऍनिमल पार्कचा केला उल्लेख
रश्मिकाने दिग्दर्शकाच्या कामाबद्दल बोलताना म्हणाली, “संदीप रेड्डी वांगाची काम करण्याची पद्धत ही इतर दिग्दर्शकांपेक्षा खुप वेगळी आहे.” यात तिने ऍनिमलच्या पुढील भगाचाही उल्लेख केला, ती म्हणाली, “ऍनिमलचा सिक्वल ‘ऍनिमल पार्क'(Animal park) हा यापेक्षाही धमाकेदार असणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा(Sandeep reddy vanga) हे फिल्म बनवन्याला एंजाॅय करतात. त्यामुळे ते ऍनिमल पार्क या चित्रपटातून याचा स्थर अजुन उचावार आहेत.”

सीक्वलबद्दल दाखवला उत्साह
संदिप वांगाबद्दल रश्मिका(rashmika Mandanna) म्हणाली, “तो माणूस खुपच वेगळ्या प्रकारे काम करतो. मला नाही माहीती ते नक्की कसे विचार करतात. काय खातात, किंवा काय करतात. परंतू तुम्ही ऍनिमलसोबत पाहिलेच की, लोकांना काय आवडतं तर ते हे आहे. हेच आहे ते जे आम्हाला दर्शकांना दाखवायला आवडतं.हीच ती कथा आहे जी आम्हाला पुढे चालू ठेवायची आहे.” पुढे ती असं म्हणाली की, “आता आमच्याकडे संपूर्ण यूनिवर्स आहे. ऍनिमल पार्क चित्रपटात आम्ही जसं पाहीजे तसं खेळू शकतो. यामुळे ही खूप उत्साही करणारी गोष्ट आहे.

यामुळे अडकला होता ऍनिमल वादाच्या बोहऱ्यात
रश्मिका पुढे म्हणाली, “एक गोष्ट जी त्यांनी(संदीप रेड्डी वांगा) मला सांगितली आणि त्यांना ती आवडते. ‘ मी ‘ऍनिमल पार्क’मध्ये ब्लास्ट करणार आहे.’ त्यांना चित्रपट बनवयला खुप मज्जा येते.” ऍनिमल(Animal) चित्रपटाबद्दल बोलायचं तर, या चित्रपटात रणबीर कपूरला(ranbir kapoor) रणविजयच्या भुमिकेत पाहायला मिळालं होतं तर त्याची पत्नी गितांजलीची भुमिका रश्मिकाने पार पाडली होती. प्रेक्षकांच्या मते चित्रपटात गितांजलीच्या भुमिकेसोबत खुप गैरवर्तन केले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

माधुरी दीक्षितचा सोशल मीडियावर जलवा, पिवळ्या साडीतील फोटो व्हायरल
प्रेम म्हणजे काय? ‘ही’ आहे संस्कृती बालगुडेची प्रेमाची व्याख्या

हे देखील वाचा