दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटाची कथा गाणी आणि डायलॉग प्रचंड गाजली. चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदानानेही (Rashmika Mandana) अभिनय केला होता. या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटातील मै झुकेगा नही साला या डायलॉग प्रचंड गाजला. इतकेच नव्हेतर सोशल मीडियावर लाखो रिल्स या डायलॉगवर व्हायरल होताना दिसत होते. सध्या चित्रपटाची अभिनेत्री रश्मिकाचाही असाच एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये कॅमेऱ्यासमोरच अभिनेत्रीने खास पुष्पा स्टाईल दाखवला आहे. रश्मिकाच्या या बिंनधास्त अंदाजावर नेटकरी चांगलेच फिदा झाले आहेत.
रश्मिका मंदाना ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे पण हिंदी इंडस्ट्रीतील प्रेक्षकही तिला पसंत करतात. इतकेच नाही तर रश्मिकाला नॅशनल क्रश देखील म्हटले जाते. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाचे सगळेच चाहते आहेत. रश्मिका शेवटची पुष्पा द राइज या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रश्मिका आणि अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी भाषांमध्येही याला पसंती मिळाली. अल्लू अर्जुनचा या चित्रपटात एक संवाद आहे, जो तो त्याच्या स्टाईलमध्ये झुकेगा नही साला असे म्हणतो. हा डायलॉग आणि त्याची एक्शन खूप गाजली. याच एक्शमधील रश्मिकाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यावेळी रश्मिकाने राखाडी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता आणि सोबत सनग्लासेस घातला होता. पण सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे मीडिया फोटोग्राफर्ससमोर पोज देताना रश्मिकाने ‘झुकेना नही साला’ची एक्शन केली. हे पाहून मीडिया फोटोग्राफर खुश झाले आणि वन्समोअर म्हणत रश्मिकाला पुन्हा करायला सांगताना दिसत आहे. रश्मिका पुन्हा तेच करते आणि हसत तिथून निघून जाते. यूजर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. दरम्यान ‘पुष्पा’ नंतर आता लवकरच ‘पुष्पा २’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा-
- ‘दृश्यम २’मध्ये अक्षय खन्नाची एन्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
- लाडक्या लेकीच्या घरी येण्याने वडील अनिल कपूरांना होतो त्रास, स्पष्टपणे सांगितले ‘हे’ महत्वाचे कारण
- राडाच ना! सपना चौधरीच्या गाण्यात डान्ससोबतच भूतांचाही तडका, पुरती घाबरली ‘डान्सिंग क्वीन’