रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच ती बॉलिवूड जगतात पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता या बातमीवर खुद्द रश्मिकानेच मौन सोडले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, पुष्पा: द राइज’च्या यशानंतर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना चर्चेत आहे. आता ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. दरम्यान अशी बातमी आली होती की, अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सततच्या चर्चेनंतर अखेर अभिनेत्री रश्मिका मंदान्नानेच या बातम्यांवर मौन तोडले आहे. अलीकडेच रश्मिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती टायगर श्रॉफसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदान्ना बुमरँग बनवताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर हे स्पष्ट झाले आहे की दोघेही लवकरच एकत्र दिसणार आहेत, मात्र चित्रपटात नाही तर दोघेही जाहिरातीच्या शूटमध्ये एकत्र दिसणार आहेत.
इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, ‘या अफवा खऱ्या आहेत… टायगर श्रॉफ आणि मी नुकतेच एका जाहिरातीसाठी शूट केले. अभिनेत्यासोबत काम करणे आश्चर्यकारक होते. त्यावर प्रतिक्रिया देताना टायगरने किती मजेदार शूट होते! नेहमीप्रमाणेच अप्रतिम’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होऊ लागला. लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि जोरदार कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
रश्मिका मंदान्ना आजकाल अनेक टॉप कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करत आहे. या अभिनेत्रीकडे गुडबाय, मिशन मजनू आणि अनिमल सारखे बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यात थलपथी विजयचा पुढील चित्रपट वारिसू आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 पाइपलाइनमध्ये आहे. रश्मिका लवकरच ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच वेळी, रश्मिका करण जोहरच्या लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये देखील दिसणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.