Monday, June 9, 2025
Home अन्य रश्मिका मंदानाला आवडतो आरसीबी संघ; पण दुसऱ्याच संघातील ‘या’ खेळाडूला म्हटले आपला ‘हिरो’

रश्मिका मंदानाला आवडतो आरसीबी संघ; पण दुसऱ्याच संघातील ‘या’ खेळाडूला म्हटले आपला ‘हिरो’

दक्षिण सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती क्रिकेटमुळे चर्चेत आहे. तिने विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आपला आवडता असल्याचे म्हटले होते. यानंतर चाहत्यांनी मिम्स तयार करण्यास सुरुवात केली होती.

आता तब्बल महिनाभरानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचा आवडता क्रिकेटपटू. रश्मिकाने नुकतेच एक इंस्टाग्राम लाईव्ह केले, ज्यामध्ये चाहत्याने तिला तिच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नाव विचारले. चाहत्यांना आशा होती की, आरसीबी आवडल्यामुळे रश्मिका विराट कोहलीचे नाव घेईल, पण तसे झाले नाही. यामुळे चाहत्यांच्या काळजावर एकप्रकारे तिने घावच केला आहे.

रश्मिकाचे वय केवळ २५ वर्षे आहे. मात्र, तिची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा तिचा आवडता क्रिकेटपटू आहे. ती म्हणाली, ‘धोनीची फलंदाजी, नेतृत्त्वगुण, यष्टीरक्षण सगळंच काही आवडते. तो माझा हिरो आहे.’ रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या निखळ हास्यामुळे चाहते कायमच तिच्या प्रेमात पडतात. रश्मिकाचे इंस्टाग्रामवर १३ मिलियन फॉलोवर्स आहेत. ती लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. रश्मिका  मंदाना  लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ चित्रपटात दिसणार आहे. चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रश्मिका मंदाना संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय आहे. रश्मिकाने कन्नड, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आतापर्यंत १० चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजकाल तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. रश्मिका आपल्या आकर्षक अदांनी, आणि आपल्या सुदर स्टाईलने चाहत्यांना घायाळ करत असते. रश्मिकाचे ‘गुडबाय’ या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ती पडद्यावर झळकणार आहे. तिने नुकताच आपला २५ व वाढदिवस याच सेटवर साजरा केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी तुमचा जबराट फॅन झालोय’, मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचे पक्षी प्रेम पाहून चाहतेही झाले खुश; पाहा गोड व्हिडिओ

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

-चक्क बिकिनी घालून मंदिरा बेदीने केले चाहत्यांना घायाळ, व्हिडिओ शेअर करत सांगितले घरबसल्या ऑक्सिजन पातळी वाढवण्याचे गुपित

हे देखील वाचा