रवीना टंडन बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रवीनाने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. रवीनाने ‘पत्थर के फूल’ सिनेमातून सलमान खानसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने त्या दशकातील सर्वच सुपरहिट अभिनेत्यांसोबत काम केले. रवीनाचे यशस्वी करिअर सुरु असताना तिने २००४ साली निर्माता अनिल थडानीसोबत लग्न केले. २००३ साली नोव्हेंबरमध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि २००४ मध्ये उदयपूर येथील जग मंदिर पॅलेसमध्ये सिंधी आणि पंजाबीपद्धतीने लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने रवीनाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो आणि एक पोस्ट शेअर करत नवऱ्याबद्दल तिचे प्रेम व्यक्त केले आहे.

रवीनाने तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. तर अनिल थडानीने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. या फोटोसोबत रवीनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “जसे की आज आपण आपल्या वैवाहिक आयुष्याच्या ‘एडल्टहुड’ जीवनात प्रवेश करत आहोत. आज १८ वर्ष मी तुझ्याकडे जास्त काही मागू शकत नाही. आपल्या चांगल्या वाईट, जाड (मी) बारीक (तू) चांगल्या वेळेतल्या प्रयत्नांच्या माध्यमातून…तूच सर्व काही आहे.”
अनिल थडानीने २००३ साली रवीनाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला लग्नाची मागणी घातली होती. रवीनाने देखील अनिलचे प्रपोजल स्वीकारत त्याला हो म्हटले आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. अनिल थडानीच्या आयुष्यात रवीना दुसरी पत्नी बनून आली. रवीनासोबत लग्नासाठी अनिलने पहिल्या पत्नीला नताशाला घटस्फोट दिला होता. रवीनाला तिचे लग्न धुमधडाक्यात करायचे होते. म्हणूनच या दोघांनी शाही अंदाजात लग्न केले. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार उपस्थित होते.

रवीना आणि अनिल यांच्या लग्नानंतर आलिशान रिसेप्शनचे देखील आयोजन करण्यात आले होते. रवीनाने वयाच्या २० व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेतले होते. या लग्नाआधी रवीना आणि अक्षय कुमार हे नात्यात होते. त्यांचे नाते मीडियामध्ये आणि लोकांमध्ये तुफान गाजले.
हेही वाचा –