Saturday, July 6, 2024

अभिनेत्री रवीना टंडनला पितृशोक, ८६ व्या वर्षी दिग्दर्शक रवी टंडन यांनी घेतला जगाचा निरोप

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील आणि बॉलिवूड दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी (11 फेब्रुवारी) रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना फुफुसांचा त्रास होता. हाती आलेल्या माहितीनुसार रवी चालण्या-फिरण्यास समर्थ होते. परंतु त्याचा त्रास अचानक वाढला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रवीनासाठी हा क्षण अगदी दुःखाचा आहे. रवीना तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. तिने सोशल मीडियावर तिच्या वडिलांसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

रवीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने तिच्या लहानपणीचे तसेच आताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाप-लेकीची बॉंडिंग साफ दिसत आहे. त्यांच्यातील प्रेम दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुम्ही नेहमीच माझ्यासोबत चालणार आहात. मी नेहमीच तुमच्यासारखी होणार आहे. मी कधीच तुम्हाला जाऊन देणार नाही. खूप खूप प्रेम पापा.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार देखील कमेंट करून रवी टंडन यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्यावर सांता क्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (Raveena Tandon father ravi tandon pass away, actress share a post)

रवी टंडन हे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी ७०-८० च्या दशकात अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो.

हेही वाचा :

हे देखील वाचा