Saturday, September 30, 2023

गंमती गंमतीत झाले वांदे! प्राण यांनी अभिनेत्रीला अचानक खेचलेले पाण्यात, घाबरून तिनेही उचललेलं मोठं पाऊल

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक खलनायक होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी खलनायकाची नकारात्मक भूमिका साकारूनही ते प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाले. या खलनायकाच्या यादीत सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेते प्राण (Pran) यांचे. प्राण यांनी त्यांच्या काळात अनेक मोठमोठ्या दर्जेदार चित्रपटांत काम केले. त्यांचा आणि अभिनेत्री हेलनचा (Helen) एक किस्सा चांगलाच गाजला होता. प्राण यांची बुधवारी(दि. 12 जुलै)ला पुण्यतिथी साजरी केली जाते. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा आणि हेलन यांच्या किस्स्याबद्दल…

अभिनेते प्राण (Pran) हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध खलनायक होते. 1940 ते 1990पर्यंत त्यांनी आपल्या अफलातून अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवून सोडली. ते स्वतः च्याच जीवावर प्रत्येक चित्रपट सुपरहिट करण्याची क्षमता असलेले अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. त्यांनी नायक म्हणूनही अनेक चित्रपटात काम केले आणि या भूमिकासुद्धा यशस्वी करून दाखवल्या.

अभिनेते प्राण जेव्हा नायक म्हणून पडद्यावर यायचे, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवायचे आणि ते जेव्हा खलनायक म्हणून समोर यायचे तेव्हा प्रेक्षकांना भीती वाटायची, इतका त्यांच्या अभिनयात जीवंतपणा होता. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच येतो की, ज्या काळात बाकीचे कलाकार 3-4 लाख मानधन स्वीकारत होते, तेव्हा प्राण यांचे मानधन 5 ते 10 लाख इतके असायचे. त्यांच्या इतके मानधन त्या काळात राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि शशी कपूर (Shashi Kapoor) यांनाच दिले जायचे. पण तुम्हाला माहितीये का? एका चित्रपटाच्या वेळी अभिनेत्री हेलन आणि प्राण यांच्यात चांगलाच वाद झाला होता.

साल 1965मध्ये प्राण आणि हेलन ‘गुमनाम’ चित्रपटात काम करत होते. त्यावेळी एका गाण्याचे शूटिंग सुरू होते. शूटिंग झाल्यानंतर सर्वजण आपापल्या मस्तीत दंग होते. यावेळी अभिनेते प्राण यांनी हेलनची गंमत करायचे ठरवले आणि ज्या स्विमिंग पूलमध्ये शूटिंग चालू होते त्यात अचानकच हेलनचा हात पकडून पाण्यात खेचले. या अचानक झालेल्या हल्ल्याने अभिनेत्री चांगलीच घाबरून गेली. त्यात त्यांना पोहताही येत नव्हते. त्यामुळे त्या चांगल्याच घाबरल्या आणि शेवटी कशा-बशा बाहेर पडल्या. मात्र, त्या प्राण यांच्यावर चांगल्याच संतापल्या होत्या. त्यांच्या या गमतीची त्यांनी थेट दिग्दर्शकाकडे तक्रार केली होती.

त्याचप्रमाणे, प्राण यांना फुटबॉलची आवड होती. त्या काळात त्यांचा स्वतःचा फुटबॉल संघ देखील होता.(when actress helen was angry with pran on the set of gumnam)

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा