बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनच्या वडिलांचे ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्या. शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रोजी तिच्या वडिलांचा तेरावा आहे. तिने ट्विट करून ही गोष्ट सांगितली आहे तसेच पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या नोट बद्दल देखील माहिती दिली आहे. ही नोट पंतप्रधान मोदी यांनी रवी टंडन यांच्या मृत्यूनंतर रविनाला पाठवली होती. पंतप्रधानांनी टंडन परिवारसाठी शोक व्यक्त केला आहे.
रविनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, “सर नरेंद्रजी यांना त्यांच्या शब्दांसाठी धन्यवाद. तुम्ही खरे सांगितले आहे, ते वर्सटाईल वर्क सोडून केले आहेत.” रविनाने आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात तिने पंतप्रधान यांनी लिहिलेल्या नोटसोबत तिच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, “आज पप्पांचा तेरावा आहे. हा तो दिवस आहे. जेव्हा आतमा सगळ्या बंधनाना सोडून अनंतात विलीन होतो. मी सगळ्यांचे त्यांना एवढे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद मानते. ते एक सज्जन दिग्दर्शक होते आणि आहेत. खऱ्या आयुष्यात प्रेम केले जाते.”
तसेच पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून लिहिले होते की, “रवी टंडन यांनी त्यांच्या रचनात्मकता आणि कौशल्य यांनी भारतीय सिनेमाला समृद्ध केले आहे. त्यांना चित्रपट निर्मतीचे सगळे पैलू होते होते. एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट बनवले आहेत. तुमचे वडील तुमच्या आयुष्यात एक मोठा प्रेरणास्रोत होते.”
यापुढे त्यांनी लिहिले की, “तुमच्या वैयक्तिक आणि कला क्षेत्रात त्यांनी दिलेले संस्कार आणि मार्गदर्शन स्पष्ट दिसतात.” त्यांच्या नोटमध्ये हे देखील लिहिलेले होते की, “आज रवी टंडन या जगात नाहीत परंतु त्यांचे मूल्य आणि शिकवण नेहमीच आपल्यासोबत राहणार आहेत.”
रविना टंडनने अनेक चित्रपटात काम केले आहे. परंतु तिने कधीही तिच्या वडिलांना सोबत काम केले नाही. ज्याचे तिला आता खूप दुःख आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिने जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा तिच्या वडिलांना रोटायमेंत घेतली होती. त्यामुळे ती तिच्या वडीलांसोबत काम करू शकली नाही.
हेही वाचा :
- दिग्दर्शक साजिद नाडियाडवालासोबत लग्न करण्यासाठी दिव्या भारतीने स्वीकारला होता ‘इस्लाम धर्म’, वाचा त्यांची लव्हस्टोरी
- बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यामुळे झाली होती साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारतीची भेट; वाचा रहस्यमयी मृत्यू झालेल्या अभिनेत्रीची कहाणी
- एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले होते शाहिद अन् करीना, मात्र ‘या’ व्यक्तीमुळे गेले नात्याला तडे!