बॉलिवूड सुपरस्टार शाहिद कपूरने अनेक रोमँटिक चित्रपटात काम केले आहे. त्याची ही भूमिका देखील त्याच्या चाहत्यांना खूप आवडली. शाहिद त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढा चर्चेत राहिला तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे. त्याच्या लव्ह लाईफमुळे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी चित्रपट जगतात रंगत असायच्या. शाहिद आणि करीना जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. असे मानले जाते की, करीना आणि शाहिदचे नाते एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हते, दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. करीना देखील शाहिदवर खूप प्रेम करत होती, पण एक दिवस असाही आला जेव्हा दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. शाहिद शनिवारी (25 फेब्रुवारी) रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया काही खास माहिती.
माध्यमांतील वृत्तानुसार, करीना आणि शाहिद यांच्यातील हे नाते अभिनेत्रीची आई बबिता कपूर (Babita Kapoor) आणि तिची बहीण करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांना अजिबात आवडत नव्हते. करीना कपूरने अनेकदा तिच्या निर्मात्यांना शाहिद कपूरला तिचा हिरो म्हणून ठेवण्यास सांगितले आणि हे अभिनेत्रीच्या आईला अजिबात आवडले नाही. 2004 मध्ये जेव्हा करीना आणि शाहिदचा ‘फिदा’ चित्रपट आला, त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. असे मानले जाते की, जेव्हा शाहिदला ‘किस्मत कनेक्शन’ आणि करीनाला ‘टशन’मध्ये काम मिळाले तेव्हाच त्यांच्या आवडी बदलल्या.
‘टशन’ चित्रपटाच्या काळातच करीना कपूरला सैफ अली खान (Saif Ali Khan) आवडू लागला. त्याचवेळी शाहिद कपूरचे नावही विद्या बालनसोबत (Vidya Balan) जोडले जाऊ लागले. माध्यमांतील वृत्तानुसार, यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांच्यात सतत भांडण होऊ लागली. ज्यामध्ये अभिनेत्रीची आई बबिता कपूरनेही हस्तक्षेप केला. अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
करीना कपूरने 2007 मध्ये सैफ अली खानला डेट करायला सुरुवात केली. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर करीना आणि सैफने लग्न केले. 2015 मध्ये शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत (Mira Rajput) लग्न केले. दोन्ही कलाकारांनी आता आपापल्या आयुष्यात प्रगती केली आहे.(actor shahid kapoor and kareena kapoor relationship actors broke up because of babita kapoor 2)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध फिल्ममेकरला मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये समन, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
सुपरस्टार अभिनेत्री ते शक्तिशाली महिला राजकारणी, अम्मा.! मृत्यूनंतर शेकडो चाहत्यांनी केल्या आत्महत्या