Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड ‘लोकं पुढे का जात नाही’, म्हणत रवीनाने अक्षय आणि तिच्या नात्यावर भाष्य करताना केला रोष व्यक्त

‘लोकं पुढे का जात नाही’, म्हणत रवीनाने अक्षय आणि तिच्या नात्यावर भाष्य करताना केला रोष व्यक्त

बॉलिवूडमधील अभिनेत्री रवीना टंडन इंडस्ट्रीमधील अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले. आजही रवीना चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावरही तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ अशी ओळख मिळवणाऱ्या रवीनाची लव्ह लाईफ इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये तुफान गाजली. ९० च्या दशकात तिचे आणि अक्षय कुमारचे नाते नेहमी चर्चेत राहिले. नुकतेच रवीनाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले आणि सांगितले आजही लोकं तिला तिचा साखरपुडा तुटला म्हणून देखील आठवतात.

रवीना नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये रवीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या. एवढेच नाही तर अक्षय आणि तिच्या नात्यावर देखील भाष्य केले. अक्षय आणि रवीनाने ‘मोहरा’ या सिनेमात सोबत काम केले. पुढे जाऊन त्यांनी त्यांचा साखरपुडा देखील मोडून टाकला. याबद्दल ती म्हणालाय, “तुटलेल्या साखरपुड्यासोबत आजही माझे नाव जोडले गेले आहे. मला हेच समजत नाही की लोकं पुढे का जात नाही.”

raveena tandon
Photo Courtesy: Instagram/officialraveenatandon

रवीना आणि अक्षय यांनी १९९४ साली सुपरहिट अशा ‘मोहरा’ सिनेमात काम केले. त्यानंतर १९९५ साली त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. या दोघांना त्यांच्या फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळाले. मात्र काही कारणांमुळे त्यांनी त्यांचे नाते आणि साखरपुडा मोडला. आजही लोकं तिला तुटलेला साखरपुडा सोबत जोडतात. ती आयुष्यात खूप पुढे गेले असली तरी लोकं आजही तिथेच आहे.

रवीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने ट्विंकल खन्नाला डेट करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी २००१ साली लग्न केले तर रवीनाने निर्माता अनिल थडानीसोबत लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या माही श्रीवास्तवच्या ‘ननद अब हद कइली’ गाण्याने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा