Saturday, June 29, 2024

बाबो! मीडियासमोरच रवी किशनने केला अभिनेत्रीला किस, वाचा रंजक किस्सा

रवी किशन (Ravi kishan) हे भोजपुरी जगतातील नाव आहे ज्याने आपल्या अभिनयाने भोजपुरी सिनेमा घरोघरी पोहोचवला. रवी किशनने भोजपुरी सिनेमा तसेच टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. रवी किशन यांचे मनमोहक व्यक्तिमत्व पाहून लाखो सौंदर्यवती त्यांच्यावर फिदा होत असतात. आणि या सुंदरींच्या यादीत भोजपुरी आणि बॉलीवूडच्या अनेक टॉप अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे. रवी किशनची बॉलीवूड अभिनेत्री नगमासोबतची प्रेमकहाणी चर्चेचा भाग राहिली, पण दोघांमधील अंतरामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. मात्र नगमासोबत ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच रवी किशनचे नाव भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीसोबत जोडले जाऊ लागले. 

राणी चॅटर्जी आणि रवी किशन एकापाठोपाठ एका हिट चित्रपटांमध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र दिसायला लागले. दोघांच्या धमाकेदार केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत होते. वाढत्या लोकप्रियतेसह, एक काळ असा होता जेव्हा राणी चॅटर्जी आणि रवी किशन या जोडीची गणना भोजपुरी चित्रपटसृष्टीतील शीर्ष जोडींमध्ये होते. आणि याचं एक कारण म्हणजे रवी किशन आणि राणी चॅटर्जीची कथा जी आजपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

रवी किशनने मीडियासमोर राणी चॅटर्जीच्या गालाचे चुंबन घेतले ते दृश्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हे पाहून या दोघांच्या लव्हस्टोरीला चांगलीच हवा मिळाली. त्या काळात सर्वत्र फक्त आणि फक्त रवी किशन आणि राणी चॅटर्जीचीच चर्चा होती. राणी चॅटर्जीनेही त्यावेळी कबूल केले होते की ती एका भोजपुरी अभिनेत्याला डेट करत होती, पण राणीने या अभिनेत्याचे नाव कधीही घेतले नाही. दरम्यान, रवी किशन अभिनयासह राजकारणातही सहभागी असतो. तो सध्या लोकसभा सदस्य आहे.

हेही वाचा- केकेच्या लेकीने वडिलांना वाहिली अनोखी श्रद्धांजली, स्टेजवर गाणे गात जागवल्या आठवणी
नैसर्गिक मृत्यू नव्हे तर हत्या! सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रेपोर्टरमधून मोठा खुलासा
पतीच्या निधनानंतर लहान मुलाला सोडून दुसरं लग्न करणार मेघना राज? सत्य आले समोर

हे देखील वाचा