Thursday, March 28, 2024

रवी किशनच्या मुलीला अग्निपथ योजनेद्वारे व्हायचंय सैन्यात भरती, पण अभिनेता म्हणाला…

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. आता या योजनेतूनच सैन्य भरती होणार आहे. या योजनेला पाठिंबा देत भोजपुरी अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीलाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांची मुलगी इशिता हिला अग्निपथ योजनेतून सैन्यात भरती व्हायचे आहे.

लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण, मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. रवी किशन हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भोजपुरी अभिनेते आहेत. त्यांनी मुलीचा फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे की, त्यांच्या मुलीलाही अग्निपथ योजनेतून सैन्यात भरती व्हायचे आहे. (ravi kishans daughter wants to join the army under agneepath scheme)

रवी किशनने त्यांच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्याकडे एनसीसी कॅडेट प्रमाणपत्र आहे. रवी किशनने लिहिले, “माझी मुलगी इशिता आज सकाळी म्हणाली, बाबा, मला अग्निपथ आर्मी रिक्रूटमेंट स्कीममध्ये सामील व्हायचे आहे. हे ऐकून मी त्याला पुढे जाण्यास सांगितले.”

रवी किशनच्या या ट्विटवर युजरने खूप कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “बरोबर आहे, निवृत्तीनंतर तुमच्या मुलीला कोणतीही कमतरता भासणार नाही.” तर दुसर्‍याने लिहिले, “लाखो तरुणांचा विचार करा, जे वयाच्या २४-२५ व्या वर्षी निवृत्त होतील.” आणखी एका यूजरने म्हटले की, “जेव्हा इशिताचे ट्रेनिंग होईल, तेव्हाही एक ट्वीट करा.”

मोदी सरकारने नुकतीच घोषणा केली की, अग्निपथ योजनेंतर्गत ४ वर्षांसाठी सैनिकांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर ७५ टक्के सैनिकांना घरी पाठवले जाईल, तर उर्वरित सैनिकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाईल. सोशल मीडियावर या योजनेच्या समर्थनात आणि विरोधात ट्वीट केले जात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा