Ravindra Berde Death | मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. ती म्हणजे आपल्या अभिनय कौशल्याने मराठी तसेच हिंदी प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालेले आहे. मागील अनेक वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्याचप्रमाणे काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. यादरम्यान त्यांना श्वास घेण्याचा खूप त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. परंतु अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
रवींद्र बेर्डे चित्रपट | Ravindra Berde Death
रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवींद्र बेर्डे यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी आनाडी, हा सुनबाईचा भाऊ, खतरनाक, होऊन जाऊ दे हमाल, दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत l, झपाटलेला भुताची शाळा अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
त्यांनी 300 पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे पाच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांना 1995 मध्ये नाटकाच्या वेळी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. आणि त्यानंतर 2011 पासून ते कर्करोगाशी झुंजत होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खूप खालवली आणि अखेर त्यांची प्राणजोत मालवली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
उत्कृष्ट अभिनयाने दशक गाजवणाऱ्या, प्रतिभावान स्मिता पाटील यांच्या 5 अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा
Bharat Jadhav birthday: ‘या’ बसमध्ये बसले होते मराठी कलाकर; भरत जाधव यांनी सांगितला अनुभव, म्हणाला..