हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गीतकार रवींद्र जैन यांची आज जयंती. 28 फेब्रुवारी 1944 रोजी अलिगढ येथील संस्कृतचे पंडित असणाऱ्या आयुर्वेद विज्ञानी इंद्रमणि जैन यांच्या घरी रवींद्र यांचा जन्म झाला. रवींद्र चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी घरीच त्यांना संगीताचे शिक्षण देण्याच्या व्यवस्था केली. असे सांगितले जाते की, कलकत्ता येथे राहणारे रवींद्र जैन यांचे गुरु राधे श्याम झुनझुनवाला यांना एक सिनेमा बनवायचा होता. अशातच 1969 रोजी ते या सिनेमाला संगीत देण्याच्या निमित्ताने मुंबईत आले आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरु झाला.
रवींद्र जैन यांनी संगीत दिलेला पहिला सिनेमा म्हणजे ‘कांच और हीरा’. या सिनेमात रवींद्र यांनी मोहम्मद रफी यांच्याकडून ‘नजर आती नहीं मंजिल’ हे एक गीत गाऊन घेतले होते. सिनेमाला यश मिळाले नसले तरी रवींद्र जैन यांना त्यांची वाट गवसली होती. पुढे 1973 मध्ये आलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या ‘सौदागर’ या सिनेमाने रवींद्र जैन यांना यशाची चव चाखायला दिली. पुढे त्यांच्या संगीताचा सुंदर प्रवास सुरु झाला.
‘चितचोर’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेयरचा पुरस्कार मिळाला. पुढे 1978 मध्ये आलेल्या ‘अंखियों के झरोखों से’ सिनेमासाठी त्यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा आणि सिनेमाच्या शीर्षक गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आला. पुढे त्यांना ‘राम तेरी गंगा मैली’साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा आणि 1991 साली आलेल्या ‘हिना’ सिनेमातील ‘मैं हूं खुशरंग हिना’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेयरचा पुरस्कार मिळाला.
चित्रपटांसोबतच रवींद्र जैन यांनी टेलिव्हिजन विश्वातील अनेक मालिकांसाठी देखील संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांनी टीव्हीवरील सर्वात गाजलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेला संगीत दिले होते. तर अनेक चौपायांना देखील आपला आवाज दिला होता. रामायण मालिकेतील संगीत आजही लोकांना आवडते आणि लक्षात आहे. अशा या दिग्गज संगीतकारांनी वयाच्या ७१ व्या वर्षी २०१५ साली या जगाचा निरोप घेतला. मात्र आजही त्यांचे संगीत लोकांच्या लक्षात आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस
‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो