Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड “राजेश खन्नाने मला थप्पड मारली होती?” – रझा मुराद यांचा स्फोटक खुलासा!

“राजेश खन्नाने मला थप्पड मारली होती?” – रझा मुराद यांचा स्फोटक खुलासा!

राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही अफवा येत असायच्या. एकदा तर अशी चर्चा होती की त्यांनी रझा मुराद यांना थप्पडच मारली! आता या गोष्टीवर रझा मुराद यांनी थेट आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे एकदम हिट कपल मानले जायचे. त्यांच्या प्रेमकथेचीही चर्चा मोठी होती अगदी एखाद्या चित्रपटासारखी! डिंपलने राज कपूर यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटातून अभिनयात पाऊल ठेवलं होतं. तेव्हा ती राजेश खन्नांना डेट करत होती, पण अचानक अफवा पसरली की,ती आपल्या को-स्टार रझा मुरादसोबत वेळ घालवत आहे.आता रझा मुराद यांनी या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी सरळ सांगितलं, “सगळं खोटं आहे, बकवास आहे!”

रझा मुराद यांनी ‘फिल्मी चर्चा’ या पॉडकास्टमध्ये एक जुन्या काळातली गोष्ट सांगितली. त्यांनी म्हणलं,“तेव्हा ‘उर्वशी’ नावाचं एक पेपर यायचं. त्यात असं छापून आलं होतं की मी आणि डिंपल कपाडिया एकाच गाडीतून फिल्मसिटीला पोहोचलो. तिथं राजेश खन्ना शूटिंग करत होते. त्यांनी डिंपलशी बोलायला सुरुवात केली, आणि म्हणे मी तिला ‘चल, आपण जाऊया’ असं सांगितलं. त्यावर राजेश खन्ना इतके चिडले की त्यांनी मला सरळ थप्पड मारली अशी अफवा त्या पेपरमध्ये छापली होती.”

रझा मुराद म्हणाले,“मी कधीच डिंपलसोबत फिल्मसिटीला गेलो नाही. अशी काहीच घटना घडलेली नाही. आणि मी, डिंपल आणि राजेश खन्ना आम्ही तिघं कधीच एकत्र कुठे भेटलो नाही. आमचं शूटिंगही वेगवेगळं असायचं डिंपलसोबत वेगळं आणि काकाजींसोबत (राजेश खन्ना) वेगळं. या सगळ्या अफवांमध्ये जरा जरी सच्चाई नाही. हे सगळं पूर्णपणे खोटं आहे १०० टक्के!”

रझा मुराद पुढे म्हणाले,“ज्याने तो खोटा लेख लिहिला होता, तो मला एका पार्टीत भेटला. पण मी त्याच्याशी काहीच बोललो नाही. अगदी नेहमीसारखंच त्याला भेटलो. कारण ती दुसऱ्याची पार्टी होती आणि अशा ठिकाणी वाद घालून वातावरण बिघडवणं योग्य नाही. खरं तर मी त्याच्याशी भांडलोही असतो, कारण त्याने माझ्यावर खूप वाईट आरोप केले होते. पण ती जागा भांडणासाठी योग्य नव्हती. त्यामुळे मी शांत राहिलो आणि काहीही गोंधळ न करता सहज वागलो.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

मेट्रो इन दिनो बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी; ३० कोटी कमावणे सुद्धा झाले अवघड…

हे देखील वाचा