राहुल देव बर्मन म्हणजेच सर्वांचे लाडके पंचमदा यांची आज 28 वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी पंचमदा यांनी वयाच्या अवघ्या54 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता.
बर्मन यांच्या रोमारोमात संगीत होते. पंचमदा हे त्यांच्या अद्वितीय संगीतासाठी ओळखले जायचे. पंचमदा यांनी चित्रपटांना संगीत देताना वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा वापर केला. ते नेहमीच वेगवेगळ्या आवाजांचा वापर संगीतामध्ये करण्यात खूप हुशार होते.
पंचमदा यांनी त्यांच्या संगीताने आणि गाण्यांनी लोकांना प्रचंड वेड लावले होते. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

आरडी यांचे वडील सचिन देव बर्मन हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि मोठे संगीतकार होते. त्यांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले. वयाच्या नवव्या वर्षी पंचमदांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले, त्या गाण्याचा वापर 1956च्या ‘फंटूश’ चित्रपटात करण्यात आला.
पंचमदा नावाने प्रसिध्द असणऱ्या आर. डी. बर्मन यांना चित्रपटसृष्टीतदेखील याच नावाने ओळखले जात असे. पंचम हे नाव त्यांना अशोक कुमार यांच्याकडून मिळाले होते. आरडी सारखा ‘पा’ असा उच्चार करीत, हे पाहून अशोक कुमार यांनी त्यांचे नाव पंचम असे ठेवले. पुढे ते याच नावाने प्रसिध्द झाले
‘आर. डी बर्मन जेव्हा लहान होते तेव्हा ते5व्या नोटवर रडायचे त्यामुळे देखील त्यांचं नाव पंचम ठेवण्यात आले. असेही सांगितले जाते. तसेच ते तुबलु नावानेदेखील परिचित होते. त्यांना हे नाव त्यांच्या आजीने दिले होते.

पंचमदा यांनी संगीतात वेगवेगळे आवाज आणले. जसे त्यांनी एकदा ‘चुरा लिया’ या गाण्यासाठी ग्लासवर चमच्याने हळूवार मार्ट येणार आवाज रेकॉर्ड करून गाण्यात वापरला. एकदा पावसाचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी त्यांनी अख्खी रात्र पावसात घालवली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलच्या बोस्सा नोव्हा या रिदमचा वापर करणारे बर्मन हे पहिले संगीतकार ठरले. त्यांनी ‘पती पत्नी’ चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेल्या ‘मार डालेगा दर्द-ए-दिल’ गाण्यासाठी या रिदमचा वापर केला होता. ‘है अपना दिल तो आवारा’ या गाण्यातील माउथ ऑरगन हे स्वतः आर.डी.बर्मन यांनी वाजवले होते.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
घरातूनच मिळाले संगीताचे बाळकडू, जाणून घ्या आरडी बर्मन यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी
रिद्धी डोगराला आवडत नाहीत आयटम नंबर? म्हणाली, ‘माझे अंगप्रदर्शन…’










