Monday, July 8, 2024

राकेशला पाहून जोरजोरात रडू लागली शमिता, व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्याच्या पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावर अनेक रियॅलिटी शो आहेत, त्यातील काही शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. यापैकीच एक शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. बिग बॉसच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, सध्या या शोचे १५ वे पर्व सुरू आहे. हा शो सध्या खूप चर्चेत आहे. दिवाळीच्या खास क्षणी वाईल्ड कार्ड स्पर्धकांनीही शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसणाऱ्या राकेश बापट आणि नेहा भसीनने बिग बॉसच्या १५ व्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. दोघेही घरात आल्यानंतर घरातील संपूर्ण वातावरण बदलले आहे. राकेश आणि नेहाला पाहून शमिता शेट्टीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शमिता दोघांनाही जोरात मिठी मारताना दिसली. दुसरीकडे राकेश आणि शमिताच्या या केमिस्ट्रीवर आता राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर, जेव्हा बिग बॉसमध्ये शमिताने राकेशला पाहिले, तेव्हा शमिता खूपच भावुक झाली. यादरम्यान अभिनेत्री रडूही लागली. राकेश आणि शमिताच्या या भावुक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत रिद्धी डोगराने दोघांच्याही नात्यावर आपले मत मांडले आहे. (Reaction of Ex Wife Ridhi Dogra On Raqesh Bapat And Shamita Shetty’s Relationship)

रिद्धी डोगराची प्रतिक्रिया
रिद्धी डोग्राने लिहिले की, “चांगले खेळा आणि चांगले राहा.” रिद्धी डोगराची ही कमेंट सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. सर्वजण अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. कारण, रिद्धी राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी आहे आणि तरीही ती राकेश आणि शमिताच्या नात्याबद्दल खूप आनंदी आहे.

राकेशला पाहून शमिता आनंदाने रडली
रिद्धी दोगराने रिट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, नेहा शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येते आणि शमिता नेहाला पाहून भावूक होते. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. दरम्यान, राकेश देखील गोरिला म्हणून शोमध्ये प्रवेश करतो आणि त्याने आपला मुखवटा काढताच शमिता त्याला पाहून हैराण होते आणि मग रडू लागते. यादरम्यान दोघेही एकमेकांना मिठी मारतात. राकेश शमिताला किसही करतो.

राकेश आणि शमिता ओटीटीमध्ये आले होते जवळ
राकेश बापट आणि शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. शोच्या सुरुवातीला दोघांचे कनेक्शन झाले होते, त्यानंतर दोघांनी एकत्र खेळ खेळला. यादरम्यान राकेश आणि शमिता एकमेकांना आवडू लागले. रिद्धी डोगराने राकेश आणि शमिताला पाठिंबा दिला होता. ती उघडपणे राकेशला घराबाहेर पाठिंबा देताना दिसली. दुसरीकडे राकेश आणि शमिता यांच्यातही बिग बॉसच्या घरात अनेकदा भांडण झाले, पण दोघांनीही समजूतदारपणाने ते भांडण सोडवले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-कपूर बहिणी झाल्या ट्रोल! जान्हवी अन् खुशीने दिलेली पोझ पाहून, नेटकरी विचारतायेत ‘असे’ प्रश्न

हे देखील वाचा