‘फँड्री’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सगळ्यात जास्त चर्चा झाली ती जब्या आणि शालूची! म्हणजेच सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात होय. मळकट कपड्यात राहणारा, गरीब घरातला जब्या आणि साधं व स्वच्छ राहणीमान असणारी, पाटलांची मुलगी शालू या दोघांनी अवघ्या प्रेक्षक वर्गाला भारावून सोडलं होतं. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच चकित केले होते.
जब्या बराच काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. आता ही जब्याची निरागस शालू खूप बदलली आहे. राजेश्वरी आता बऱ्यापैकी बोल्ड झाली आहे. (red light marathi film poster fandry fame actress rajeshwari kharat)
‘फँड्री’ नंतर आता आगामी काळात राजेश्वरी खरात ‘रेड लाईट’ या चित्रपटात झळकणार आहे. होय! ही बातमी स्वतः राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. नुकतंच तिने तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ती बेडवर बसलेली दिसत आहे. सोबतच तिने साडी परिधान करून, वेणी घातली आहे. अशा लूकमध्ये ती रागाने बघताना दिसली आहे.
हे पोस्टर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का? प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्रीची तुला!” एकंदरीत पोस्टर आणि याचे कॅप्शन पाहून लक्षात येतं की, हा एका वैश्या असणाऱ्या स्त्रीवर आधारित चित्रपट असणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार यांनी केलं आहे, तर चित्रपटाची निर्मिती निलेश नगरकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे ‘फँड्री’मध्ये साधी आणि सोज्वळ दिसणारी शालू आता या दमदार भूमिकेत कशी दिसेल, हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अगदी काही तासांतच या पोस्टवर २३ हजाराहून अधिक व्ह्यूज आले आहेत. पोस्टवर कमेंट करत नेटकरी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘उडण्यासाठी पंखांची गरजच काय?’, म्हणत ऋतुजा बागवे कडून ग्लॅमरस फोटो शेअर
-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!