Saturday, March 22, 2025
Home बॉलीवूड ‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार यश याच्या ‘केजीएफ’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये खूप धमाल केली आहे. ‘केजीएफ’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना पहिला पार्ट खूप आवडला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिले होते. आता प्रेक्षकांमध्ये ‘केजीएफ २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा चालली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट १६ जुलै २०२१ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांनी अजूनही या चित्रपटाची प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली नाही. (KGF 2 teaser hits 200 milian views on YouTube)

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून समोर आली नाही. पण या चित्रपटाचा टीझर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. जानेवारी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या टीजरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. प्रेक्षक सातत्याने हा टीझर बघत आहेत. यामध्ये यशसोबत संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टीची झलक पाहायला मिळते. या टीझरला जोरदार व्ह्यूज मिळत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाच्या टीझरला यूट्यूबवर २०० मिलियन म्हणजेच २० कोटी पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या टीझरला ८.४ पेक्षाही जास्त लाईक्स देखील मिळाले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील काही चित्रपटांना खूप पसंती मिळते, त्यातीलच एक म्हणजे ‘केजीएफ’. या चित्रपटाचा पहिला भाग १ डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे सगळेजण चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार आहे, याची वाट बघत आहेत. परंतु कोरोनामुळे प्रेक्षकांना बरीच वाट पाहावी लागत आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’ चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर २४ तासातच सुपरहिट झाला होता. या टीजरला २४ तासात ६ कोटी व्ह्यूज मिळाले होते. ३७ लाख लाईक्स मिळाले होते. या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेता, सुपरस्टार यशच्या वाढदिवशी, म्हणजेच ७ जानेवारीला संध्याकाळी हा टीझर प्रदर्शित केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

हे देखील वाचा