मित्रांनो, तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल ना की एखाद्या ऍक्टरने त्याच्या को-ऍक्टरशी लग्न केले. तसं, तर प्रेम कोणावरही, कुठेही आणि केव्हाही होऊ शकते. त्यामुळे को-स्टारशी लग्न करणे फार काही विशेष गोष्ट नाही. पण काही ऍक्टर्स असे आहेत, जे मालिकांमध्ये त्यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडले. काहींनी तर लग्नही केले. कोणत्या आहेत आशा जोड्या चला जाणून घेऊयात
या यादीतील पहिली जोडी म्हणजे अमन वर्मा आणि वंदना लालवानी. टेलिव्हिजनवर जानेमाना ऍक्टर असलेल्या अमन वर्माने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण शपथ शोमध्ये त्याची बहिणीची भूमिका साकारणाऱ्या वंदना लालवानीने मात्र त्यांचे हृदय चोरले. मालिकेत बहिण-भाऊ असले, तरी बाहेरील दुनियेत ते रिलेशनशीपमध्ये आले होते, त्यांनी त्यांच्या या प्रेमाला २०१६ साली एका गोड नात्यात बांधत लग्न केले.
अमन आणि वंदना प्रमाणेच किरण करमारकर आणि रिंकू धवन यांनीही लग्नगाठ बांधली होती. 2000च्या आसपास घराघराच प्रसिद्ध झालेली मालिका कहाणी घरघर की यामध्ये किरण आणि रिंकू यांनी भावाबहिणीची भूमिका साकारली होती. पण ही मालिका साकारताना ते खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना त्यांच्या प्रेमाला लग्नमंडपापर्यंत नेण्यातही यश आले. त्यांनी 2000 साली लग्नगाठ बांधली होती. पण 15 वर्षे संसार केल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी परस्पर समजूतीने वेगळे होण्याचे ठरवल्याचे सांगितले होते. या दोघांना एक मुलगाही आहे.
मेरे आंगन मे या मालिकेत नीरज मालवीय आणि चारू आसोपा यांनी भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती. यावेळी हे दोघेही जवळ आले. पुढे त्यांना आपल्या प्रेमाला नात्याचे नाव देण्याचेही ठरवले आणि 2016मध्ये साखपूडाही केला होता. पण साखरपूड्यानंतर या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लग्नही झाले नाही. पुढे चारू आसोपाने राजीव सेनशी लग्न केले. राजीव अभिनेत्री सुश्मिता सेनचा सख्खा भाऊ आहे.
एक वीर की अरदास वीरा ही मालिकाच भावा-बहिणीची कथा सांगणारी होती. यात भाऊ आणि बहिणीचे काम करणारे शिविन नारंग आणि दिगंगना सुर्यवंशी हे दोघेही खऱ्या आयुष्यात प्रेमात पडल्याचे अनेक रिपोट्समध्ये सांगण्यात आले. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.
रोहन मेहरा आणि कांची सिंग या दोघांनी प्रसिद्ध मालिका ये रिश्ता क्या केहलाता है मध्ये भाऊ – बहिणीची भूमिका निभावली होती. पण या मालिकेदरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2016मध्ये त्यांनी त्यांच्यातील नात्याची कबुलीही दिली होती. पुढे काही वर्षे ते रिलेशनशीपमध्ये होते. पण नंतर त्यांनी ब्रेकअप केले.
इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ: रिल लाईफमध्ये भाऊ-बहिण, पण खऱ्या आयुष्यात पडले प्रेमात |Reel Life Brother-Sister| Real Life Partners