बॉलिवूड चित्रपटांमध्ये 90च्या दशकात आई आणि मुलाचे नाते फार प्रेमळ आणि सुंदर दाखवण्यात आले आहे. इतकेच नाहीतर अभिनेत्री त्यांच्या अभिनयाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना भावूक करत होत्या. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 बॉलीवूड अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी पडद्यावर आईची भूमिका साकारून लोकांना भावूक केले.
रीमा लागू
रीमा लागू या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होत्या ज्यांनी अनेकदा पडद्यावर आईची भूमिका साकारली होती. त्यांनी ९० च्या दशकातील ‘साजन’, ‘मैने प्यार किया’, ‘वास्तव’, ‘आशिकी’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘रंगीला’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये आईची भूमिका करून रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांना भावूक केले होते.
राखी गुलजार
राखी गुलजार आता रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे दूर आहे. मात्र, राखीने ‘सौगंध’, ‘खलनायक’, ‘बाजीगर’, ‘राम लखन’, ‘सोल्जर’ आणि ‘करण अर्जुन’सह अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. करण अर्जुन या चित्रपटातील ‘मेरे करण-अर्जुन आएंगे’ हा डायलॉग आजही चर्चेत आहे.
अरुणा इराणी
अरुणा इराणी ह्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यांनी ‘बेटा’, ‘राजा बाबू’, ‘सुहाग’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली होती, त्यांना आईच्या भुमिकेत खूप पसंती मिळाली होती.
वहिदा रहमान
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनीही पडद्यावर आईची भूमिका साकारून प्रेक्षकांना भावूक केले आहे. ‘लम्हे’, ‘स्वयम’, ‘ओम जय जगदीश’, ‘मैने गांधी को नही मारा’ आणि ‘रंग दे बसंती’ यांसारख्या चित्रपटात आईची भूमिका करून त्या चर्चेत राहिल्या. वहिदा रहमान आता सिनेसृष्टी पासून दूर आहेत.
फरीदा जलाल
फरीदा जलाल या 90च्या दशकातील लोकप्रिय आई होत्या. त्यांनी असंख्य चित्रपटात आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. त्यांनी ‘जिद्दी’, ‘पिंजर’, ‘दिल तो पागल है’, ‘बिग ब्रदर’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ आणि ‘जवानी जानेमन’ सारख्या अनेक दमदार चित्रपटात आईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रणबीर-आलियाचं ‘ब्रह्मास्त्र’ सुटण्याआधीच आपटलं! कोर्टाच्या निर्णयानंतरही घडला अनर्थ
उर्फी जावेदने अखेर ‘त्या’ पोरीला शोधलंच! टॅलेट पाहून तुमच्याही होतील बत्त्या गुल
‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्णा अभिषेक देखील दिला डच्चू