‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्‍णा अभ‍िषेक देखील दिला डच्चू

0
62

काही नवीन कलाकारांसह तर काही जुन्या कलाकारांसह द कपिल शर्मा शाे पुन्हा एकदा प्रेषकांच्या हजेरीत येत आहे. परंतु शाेमध्ये अनेक मजेशीर व्यक्तिरेखा साकारणारे चंदन प्रभाकर या सीजनमध्ये काम करणार नाही. याआधी कृष्णा अभिषेक याशाेच्या बाहेर पडले. कृष्णा आणि मेकर्स यांच्यामध्ये फीला घेऊन मतभेद झाले ज्यामुळे त्यांनी हा शाेसाेडला. आता चंदननेही शो सोडल्याची पुष्टी केली आहे.

चंदन प्रभाकरने (Chandan Prabhakar) एका मुलाखतीत  ‘द कपिल शर्मा शो’ साेडण्या मागचे कारण सांगितले. ते म्हणाले, “मी द कपिल शर्मा शोचा या सीझनचा हिस्सा बनणार नाही आणि याचे विषेश कारणही नाही. मी फक्त एक ब्रेक घेऊ इच्छिताे.” या सीझनमध्ये चंदनच नसण हा मेकर्ससाठी आणि शाेच्या प्रेक्षकासाठी निराशाजनक आहे.

चंदन प्रभाकर वर्षांपासुन या कार्यक्रमाचा हिस्सा आहे आणि कपिलचा बालपणीचा मित्र. कार्यक्रमात दाेघांची हाेणाऱ्या नोंकझोकला चाहत्यांची खुप पंसती मिळत हाेती. दाेंघानी भरपुर वर्ष साेबत काम केले. चंदन व्यतिरीक्त भारती सिंंग देखील कार्यक्रमाचा हिस्सा राहणार नाही. भारती शोमध्ये पात्रानुसार दिसणार आहे.

भारती म्हणाली, “ मी छाेट्या ब्रेकवर आहे, आणि मी ‘सारेगामापा लिटिल चॅंप्स 9’ शाे देखील करत आहे. याचाअर्थ हा नाही की, मी ‘द कपिल शर्मा शो’ करणार नाही, मी अधून- मधून कार्यक्रमात येत राहीन. कारण आता मला एक लहान बाळ आहे आणि इव्हेंट देखील.”

द कपिल शर्मा शोला सुरु हाेण्यात फक्त काही दिवस बाकी आहे. हा शाे 10 सप्टेंबर पासुन सुरु हाेणार आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा व्यतिरीक्त  पूरन सिंग, सिद्धार्थ सागर, कीकू शारदा, सृष्टि रोडे, सुमोना चक्रवर्तीसारखे कलाकार दिसणार आहे. शाेच्या विशेष भागासाठी अक्षय कुमारने पहिलेच शुट केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कॅटरिनाच्या ‘या’ सवयीने वैतागला अभिनेता इशान खट्टर; म्हणाला, ‘तिच्याशी बोलणे म्हणजे भिंतीशी…’

‘या’ गोष्टीला बॉयफ्रेंड आदील खानने घातली बंदी, राखी सावंतने केला खुलासा; म्हणाली, ‘इस्लाममध्ये असे…’
भारती सिंग आणि कृष्णा अभिषेकनंतर याही अभिनेत्याने सोडली कपिल शर्मा कार्यक्रमाची साथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here