Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड जस्ट मॅरिड रिया कपूरने शेअर केला तिचा आणि करण बुलानीचा सुंदर फोटो म्हणाली, ‘मी आजपर्यंत पाहिलेल्या व्यक्तींमध्ये….

जस्ट मॅरिड रिया कपूरने शेअर केला तिचा आणि करण बुलानीचा सुंदर फोटो म्हणाली, ‘मी आजपर्यंत पाहिलेल्या व्यक्तींमध्ये….

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आणि निर्माती रिया कपूर हिचे नुकतेच करण बुलानीसोबत लग्न झाले. हे लग्न अतिशय खासगी स्वरूपाच्या कार्यक्रमात संपन्न झाले. रियाने अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अनिल कपूर यांच्या जुहू येथील बंगल्यात हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या दोन दिवसांनी रियाने तिचा आणि करणचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये करण रियाला अंगठी घालताना दिसत आहे. दोघांच्याच्या चेहऱ्यावर असलेला प्रचंड आनंद आपल्याला स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रियाने लिहीले की, “१२ वर्षानंतर मी घाबरुन जायला नको. कारण तु माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि मी आज पर्यंत अनुभवलेल्या व्यक्तींमध्ये तु सर्वोत्तम आहेस‌. आपल्या या लग्नाचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच वेगळा आहे. रात्री ११ वाजता आई-वडील झोपण्याच्या अगोदर घरी येणारी मुलगी मी नेहमीच असेल. मला माहित नव्हते की, मी इतकी भाग्यवान आहे, आणि मी आशा करते की यापुढे मला हे कुटुंब आपलेसे करेल.” (reha kapoor shared the first photo after her weeding)

दरम्यान, या विवाह सोहळ्यास मोजक्या आणि जवळच्या नातेवाईकांची उपस्थित होती. अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरसह अनेक जवळच्या पाहुण्यांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित लावत हा सोहळा अधिकच खास बनवला. रिया आणि करण मागील १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची पहिली भेट ‘आयशा’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या दोघांच्या विवाहाचे निमंत्रण कोणालाही देण्यात आले नव्हते. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यांनी विवाह सोहळा अगदी सध्या पद्धतीने पार पडला.

रिया अभिनेत्री नसली तरी ती याच क्षेत्रात निर्माती म्हणून कर्यरत आहे. तिने आतापर्यंत ‘आयेशा’, ‘खूबसूरत’, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. शिवाय तिने सोनम कपूरसोबत ‘रियासन’ हा कपड्यांचा एक ब्रँड देखील सुरु केला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा