Saturday, January 17, 2026
Home अन्य गुम है किसी के प्यार मैं: रेखा यांच्या दिलकश अंदाजाने गाजतोय मालिकेचा प्रोमो, लवकरच येणार मोठा ट्विस्ट

गुम है किसी के प्यार मैं: रेखा यांच्या दिलकश अंदाजाने गाजतोय मालिकेचा प्रोमो, लवकरच येणार मोठा ट्विस्ट

बॉलिवूडमधील सदाबहार सौंदर्याची महाराणी आणि सर्वांच्या मनावर निर्विवाद राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ‘रेखा.’ आधीच्या काळाइतक्याच सुंदर आणि आकर्षक त्या आजही दिसतात. या संपूर्ण जगात त्यांचे करोडो फॅन्स आहेत. आजच्या, आधीच्या काळातील अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. आज टेलिव्हिजनच्या क्षेत्राची व्याप्ती बघता अनेक मोठ्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी टीव्ही इंडस्ट्रीकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आदी कलाकारांनी टीव्हीमध्ये देखील यश मिळवले आहे. या यादीत दिग्गज अभिनेत्री रेखा यांचा समावेश झाला आहे. रेखा यांनी स्टार प्लसच्या ‘गुम हैं किसी के प्यार मैं’ या मालिकेत सूत्रधाराची भूमिका निभावली आहे.

या मालिकेसाठी रेखा सूत्रधारची भूमिका निभावणार असल्याचे जेव्हा प्रेक्षकांना समजले तेव्हा या मालिकेसाठीची त्यांची उत्सुकता अधिकच वाढली होती, आणि जेव्हा त्यांचा या मालिकेसाठीचा पहिला प्रोमो समोर आला त्यानंतर तर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली. आता पुन्हा रेखा या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमधून समोर आल्या आहेत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘गुम है किसी के प्यार में’ या शोची ओळख आहे.

सध्या या मालिकेची जोरदार चर्चा आहे. एकत्र मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, आणि दुसरे म्हणजे अभिनेत्री रेखा. मालिकेत पुढच्या काही भागांमध्ये येणाऱ्या ट्विस्टबद्दल सांगताना रेखा यांचा एक नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे सम्राट येणाऱ्या काही भागांमध्ये पाखीला (पत्रलेखा) घटस्फोट देणार असल्याचे जाहीर करतो आणि सर्वांनाच धक्का बसतो. प्रोमोमध्ये रेखा प्रेमात असलेल्या गुंत्याबद्दल सांगत आहेत. रेखा सांगतात, “हे प्रेम देखील कोणकोणत्या परीक्षांमधून जाते. कालपर्यंत जे फक्त कर्तव्य होते, ते आज प्रेम बनले आहे. प्रेम आणि विश्वास सोबत कधीच चालत नाही. यातच भूतकाळ वादळ बनून आले तर? कोमेजलेल्या क्षणांच्या आठवणी ताज्या होतात आणि इच्छा नसूनही कालचे प्रेम आज कर्तव्य बनते.” यातच सम्राट पत्रलेखाला घटस्फोटाचे सांगताना दिसत आहे. रेखाचा हा नवा प्रोमो खूपच गाजत आहे. रेखा यांच्या या प्रोमोची खास गोष्ट म्हणजे त्यांचा अंदाज, त्यांची बोलण्याची अदब लोकांना आजही घायाळ करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा