Monday, July 1, 2024

‘भूल भूलैया २’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर, मोशन पोस्टरमध्ये दिसला कार्तिक आर्यनचा जलवा

राज्य सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असून, कलाकार आणि निर्मात्यांमध्ये उत्साहाची आणि सुखाची लाट पसरल्याचे दिसत आहे. अशात कोरोना महामरीचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांनी आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकली होती. आता चित्रपटगृह सुरू होणार असल्याने, अनेकांनी आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अशात काहींनी पुढच्या वर्षीच चित्रपट प्रदर्शित करणे पसंत केले आहे. त्यातीलच एक ‘भूल भुलैया २’ चित्रपट.

अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मोशन पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत ‘भूल भुलैया २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार्तिक एका कमानीवर अनोख्या अंदाजामध्ये बसला आहे. त्याच्या हातामध्ये आणि गळ्यामध्ये विशेष पद्धतीच्या माळा आहेत. तसेच बॅकग्राऊंडला चित्रपटाचे म्युझिक वाजत आहे. आजूबाजूला काही पक्षी देखील उडताना दिसत आहेत. त्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही २५ मार्च २०२२ ला हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहांमध्ये पाहू शकता.” (Release date of Bhool Bhulaiyaa 2 revealed, Kartik Aaryan’s performance in motion poster)

चित्रपटावरून अनेक अफवा पसरल्या आहेत. अनेक जण म्हणत आहेत की, हा चित्रपट बॉक्स ऑफिस फ्लॉप होणार आहे. तसेच हा चित्रपटात ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या मोठ्या कमाई करणाऱ्या चित्रपटाला धडकणार आहे. यामध्ये बेनेडिक्ट कंबरबैच मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘भूल भूलैया २’ साल २०९७ मध्ये आलेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल आहे. ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. तसेच त्यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.

‘भूल भूलैया २’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. या चित्रपटाचे ३ पोस्टर १९ ऑगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटामध्ये कार्तिक, कियारा आणि तब्बू पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा