प्रियांका चोप्राला हिंदी चित्रपट क्षेत्रातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर ती परदेशात रहायला गेली होती. प्रियांका सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. सोशल मीडियावरुन ती नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच प्रियांकाने स्पेनमधून स्कुबा डायव्हिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
प्रियांका चोप्रा सध्या स्पेनमध्ये ‘सिटाडेल’ नावाच्या वेबसिरीजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यासोबतच ती स्पेनमध्ये पती निक जोनास आणि आईसोबत सुट्ट्य़ांची मजा घेताना सुद्धा दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने आई मधु चोप्रासोबत समुद्रकिनारी फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता पुन्हा एकदा प्रियांका समुद्रात स्कुबा डायव्हिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. (relieve stress priyanka chopra dives in the sea with the team of citadel)
प्रियांकाने या फोटोंना कॅप्शन ही दिले आहे की, “अनेक वेळा अशा संधी येतात जेव्हा तुम्ही ताण दूर करू शकता, यावेळी यापेक्षा सुंदर काय असेल. जर तुम्ही ईश्वराच्या सुंदर रचना पाहू शकाल.” तिने या फोटोखाली ‘सिटाडेल’च्या कॅमेरामॅनचे आभारही मानले आहेत.
प्रियांकाने हे फोटो रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यावेळी ती ‘सिटाडेल’च्या टीमसोबत फिरायला गेली होती. यामध्ये प्रियांका खूपच आनंदी दिसत असून पाण्यामध्ये सूर मारून पोहण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ज्यामध्ये तिच्या बोल्ड अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले होते.
दरम्यान प्रियांका चोप्रा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. १८ जुलै १९८२ रोजी जन्मलेल्या प्रियांकाने २००० सालचा मानाचा मिस वर्ल्ड किताब पटकावला होता . अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ चित्रपटातून प्रियांकाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रियांकाने मिळवले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-निक जोनास पत्नी प्रियांका चोप्रावर किती प्रेम करतो? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये व्यक्त केल्या आपल्या भावना
-स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणारी प्रियांका का झाली निराश? सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी