Wednesday, July 3, 2024

लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

स्वप्नांची नगरी म्हणजे मुंबई. अनेकदा तिला मायानगरी असेही म्हटलं जातं. याच मुंंबईतील बॉलिवूडमध्ये अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईच्या दिशेने येत असतात. ही बॉलिवूड इंडस्ट्री वरवर जेवढी आकर्षक आणि ग्लॅमरस वाटते, तेवढेच तिच्या खोलात गेले की त्यातील सत्य सर्वांसमोर येते. या बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टींचे कोडे अद्याप सुटलेले नाही. यापैकीच एक कोडे म्हणजे अभिनेत्री जिया खानचा (Jiah Khan) मृत्यू. आज तिची पुण्यतिथी आहे. चला तर मग आपण तिच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊया…

वादग्रस्त चित्रपटातून केली अभिनय कारकीर्दीची सुरुवात
जियाचा जन्म २० फेब्रुवारी, १९८८ साली न्यूयॉर्कमध्ये झाला होता. तिचे खरे नाव रिझवी खान असे होते. ज्यावेळी जिया खान केवळ २ वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील घर सोडून गेले होते. जिया जेव्हा १६ वर्षांची झाली, तेव्हा तिने ‘तुमसा नहीं देखा’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार होती. परंतु तिला त्यात अपयश आले. यानंतर तिने ‘नि:शब्द’ या वादग्रस्त चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. यामध्ये तिच्यासोबत ‘बिग बी’ अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. (remembering bollywood actress jiah khan on her death anniversary)

जियाला बाहेरचा रस्ता दाखवत जेनेलिया डिसूजाला घेतले चित्रपटात
जिया खानची आई राबिया अमीन देखील अभिनेत्री होती. सोबतच जिया खानची आत्या संगीता (परवीन रिझवी) आणि कविता पाकिस्तानी अभिनेत्री होत्या. जिया खानने ६ वर्षांच्या वयात ‘रंगीला’ चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहूनच तिची अभिनयाची आवड वाढली होती. जिया खानला शाहिद कपूरही खूपच आवडत होता, त्यामुळे तिच्या हातून केन घोष यांचा चित्रपटही गेला होता. जियाने शाहिद कपूरसोबत ‘चान्स पे डान्स’या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. परंतु नंतर केन घोषने तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत तिच्या जागी जेनेलिया डिसूजा म्हणजेच रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुखला घेतले होते. यावरही अनेक दिवसांपर्यंत वाद होत राहिला होता.

जिया खान बॉलिवूडमधील काही यशस्वी चित्रपटांचा भाग होती. परंतु तिच्या मृत्यूने संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केले होते. तिने ३ जून, २०१२ला केवळ वयाच्या २५ व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर अनेक प्रकारच्या गोष्टी समोर आल्या होत्या. तिच्या आईने अभिनेता सूरज पंचोलीवर जियाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आरोप लावले होते. सूरज पंचोली त्यावेळी जियाचा बॉयफ्रेंड होता.

मृत्यूच्या आधी जिया खानने दु:खाचा सामना केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी जियाने ६ पानांचे पत्र लिहिले होते. त्यामध्ये तिने सूरज पंचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात सूरज पंचोलीला काही काळ तुरुंगातही राहावे लागले होते. तरीही, सूरज पंचोलीने जियाच्या आत्महत्येसाठी स्वत:ला जबाबदार ठरवले नाही. त्याने म्हटले होते की, “जिया खानवर लहान वयात काम करण्याचा ताण होता, त्यामुळे ती मानसिकरीत्या त्रस्त होती.”

नुकतेच बीबीसीने जिया खानच्या मृत्यूवर एक डॉक्युसीरिज बनवली आहे. याच्या प्रसारणानंतत प्रेक्षक मुंबई पोलिसांवर मुख्य पुरावे शोधण्यात अपयशी ठरल्याचे आरोप करत आहेत. या सीरिजमध्ये जिया खानच्या आईने दावा केला आहे की, जियाची हत्या झाली आहे. सोबतच या सीरिजमध्ये सूरज पंचोली आणि तिच्या सुसाइड नोटचीही चर्चा आहे, ज्यामध्ये जियाने सूरज पंचोलीसोबतच्या आपल्या कठीण काळातील नात्याविषयी लिहिले होते.

जिया खानने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येच काम केले. त्यामध्ये ‘गजनी’, ‘हाऊसफुल’, ‘दिल से’, ‘आप का साया’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा