Monday, July 8, 2024

सलमानला देवदूत सांगत लिझेल डिसुझाने मानले आभार, सोशल मीडियावर शेयर केली पोस्ट

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेमोवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसांनी रेमो घरी देखील आला.

रेमो आणि लिझेल या दोघांसाठी यावर्षीचा ख्रिसमस खूप खास ठरला. कारण रेमो एवढ्या आजारातून उठून ख्रिसमसच्या आधी घरी परतला आणि ख्रिसमस त्याने त्याच्या परिवारासोबतच साजरा केला. यानिमित्ताने रेमोच्या बायकोने लिझेलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत ज्यांनी तिला या कठीण प्रसंगात मदत केली अशा लोकांचे आभार मानले आहेत.

लिझेलने तिच्या या पोस्टमध्ये तिचा आणि रेमोच्या एक छान फोटो शेयर करत म्हटले आहे की, ‘आज पर्यंतचे माझे ख्रिसमसचे सर्वात मौल्यवान गिफ्ट. ह्या क्षणाला मी खूप सांभाळून ठेवणार आहे. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर आज मी तुला माझ्या मिठीत घेतले आहे. जरी मी तुझ्यासमोर एक सुपरवूमन सारखे वागत होती तरी प्रत्यक्षत मात्र असे काही नव्हते. माझा एका गोष्टीवर खूप विश्वास होता त्यात कदाचित देव किंवा तू मला दिलेले ते वाचन ज्यात तू म्हणाला होता की, तू एखाद्या योध्या सारखा लढशील आणि पुन्हा परत माझ्याजवळ येशील.’ ती पुढे सलमानला धन्यवाद देताना म्हणाली, ‘ धन्यवाद सलमान मला भावनिक पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यासोबत उभे राहिल्याबद्दल. तू खरंच माझ्यासाठी देवदूतांपेक्षा कमी नाहीये.’

या सोबतच लिझेलने कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि कोरिओग्राफर सलमान खानचे देखील आभार मानले आहेत. लिझेलने सर्वाना तिच्या पाठीशी उभे राहून मदत केल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. शेवट तिने सर्वाना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

कोरिओग्राफर म्हणून रेमोने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिग्दर्शनामध्ये त्याने पाऊल टाकले. २०१३ साली त्याने ‘फालतू’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. नंतर त्याने ‘एबीसीडी’ ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’या डान्सवर आधारित चित्रपटाचे आणि सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘रेस ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. याशिवाय तो ‘डान्स इंडिया डान्स’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘डान्स प्लस’ या शोचा परीक्षकही होता.

हे देखील वाचा