Friday, July 5, 2024

प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर ‘रेमो डिसूजा’ याला हार्ट अटॅक, चाहत्यांमध्ये खळबळ

प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा याला हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. त्याला अगदी गंभीर अवस्थेत मुंबईतील कोकिलाबेन रुग्णाल्यात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

रेमो डिसूजाला हार्ट अट‌ॅक आल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार त्याच्यावर अँजिलोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

रेमो डिसूजा हा अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिभावान डान्सर आणि कोरियोग्राफर असून त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. टेलिव्हिजनवरील अनेक च‌ॅनलवर चालणाऱ्या डान्सच्या कार्यक्रमात तो जज म्हणून आणि मार्गदर्शकाची भुमिका पार पाडताना आपल्याला दिसतो.

रेमोची स्वतःची डान्स अकॅडमी आहे. डान्स इंडिया डान्स, झलक दिखलाजा आणि स्टार प्लसवरील डान्स प्लस अशा डान्स शोचे जजींग केले आहे. त्याच्या उत्तम कामगिरीसाठी आणि कोरियोग्राफीसाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.

हे देखील वाचा