Saturday, June 29, 2024

Breaking! प्रसिद्ध गायकाचे स्टेजवर गात असताना भर कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्राझीलमधील लोकप्रिय गॉस्पल गायक हेन्रिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची बातमी एकून त्याच्या चाहत्यांना धक्काबसला आहे.

हेन्रिक (Singer Henrique) ब्राझीलमधील एका धार्मिक कार्यक्रमात गायन करत असताना अचानक बेशुद्ध पडले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हेन्रिकचे रेकॉर्ड लेबल टोडह म्युझिकने दिलेल्या माहितीनुसार, त्याला हृदयविकाराचा झटका आला होता.

हेन्रिक यांचा मृत्यू (Pedro Henrique brazilin singer death) संगीतविश्वासाठी मोठा धक्का आहे. त्यांचे चाहते आणि सहकलाकार त्यांच्या निधनाने शोकाकुल झाले आहेत. हेन्रिक यांचा जन्म ब्राझीलच्या सॅंटोस शहरात झाला. त्यांनी लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गायन केले होते. त्यांचे गायन खूप लोकप्रिय होते. हेन्रिक यांचे निधन हे ब्राझीलमधील गॉस्पल संगीत क्षेत्रासाठी मोठा तोटा आहे. ( Brazilian singer dies after suffering heart attack during live performance)

चालू कार्यक्रमात बेशुद्ध पडल्यानंतर गायक हेन्रिकचा मृत्यूव झाला आहे. त्या घटेनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. 30 वर्षीय हेन्रिकने अगदी कमी वयात गाणे गायला सुरूवात केले. नंतर, स्थानिक बँडमध्ये सामील होण्यापूर्वी त्याने त्याच्या YouTube चॅनेलवर अनेक व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. त्याच्या पश्चात त्याची पत्नी सुइलान बॅरेटो आणि त्याची दोन महिन्यांची मुलगी झो आहे. (Renowned singer Henrique dies of heart attack while singing on stage)

आधिक वाचा-
दीपिका पदुकोणने केली व्यंकटेश्वर मंदिरात पूजा, व्हिडिओ झाला व्हायरल
‘मलायकाशी लग्न कधी करणार?’ करण जोहरच्या शोमध्ये अर्जुन कपूरने दिले खुलेपणाने उत्तर

हे देखील वाचा