Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘नाटू नाटू’ गाण्याच्या गायकांना गव्हर्नर हस्ते सन्मान प्राप्त, पाहा व्हायरल व्हिडिओ

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘नाटू नाटू’ गाण्याच्या गायकांना गव्हर्नर हस्ते सन्मान प्राप्त, पाहा व्हायरल व्हिडिओ

एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटामधील नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2023 हे नामांकन प्राप्त केल्याने सर्वत्र चित्रपटीचे कौतुक झाले. त्याशिवाय भारतीयांसाठी या ही खूप अभिमानस्पद बाब घडवून आणल्यामुळे राजानौलींचे देखिल कौतुक करण्यात आलं. अशातच नाटू नाटू हे गाणं ऑस्कर नामांकणासाठी देखिल शॉर्टलिस्ट करण्यात आलं. आज (दि, 26 जानेवारी) रोजी देखिल या गाण्याचे कंपोजर एमएम कीरावनी आणि सुभाष चंद्रबोस यांना हैद्राबादमध्ये आयोजित गणतंत्र्या कार्यक्रमादिवशी दिवशी तेलंगणा राज्यामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.

ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआर (RRR) मधील ‘नाटू नाटू’ (Natu Natu) या गाण्याने जगभरातील प्रेक्षकांना नाचवलं आहे, त्याशिवाय गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं असून ऑस्कर लिस्टमध्ये देखिल नाटू नाटू गाण्याने मोलाचं स्थान मिळवलं. अशातच एमएम कीरावनीन (M. M. Keeravani) यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गव्हर्नरने स्मृती चिन्ह आणि प्रमाण पत्राने सन्मानित केलं आहे. त्यासाठी किवारवनी यांनी सगळ्यांचे मनभरुन आभार मानले आहेत. त्याशिवाय प्लेबॅक सिंगर सुभाष चंद्रबोस (Subhash Chandrabos) यांना देखिल स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केलं.

एसएस कीरावनी यांनी गोल्ड ग्लोब अवॉर्ड विजेता आणि ऑस्कर 2023 साठी नामांकित नाटू नाटू गाण्याबद्दल सांगत असताना गाण्याला आपलं मूल सांगतिलं होतं. त्यांनी सांगिते होते की, “काही दिवसांपूर्वी ते माझ्यासाठी माझ्या मुलासारखं होतं आणि आतं माझं मुल ठिक ठिकाणी जाऊन माझं नाव रोशन करत आहे. सध्या मी एका गौरवान्तित बापासारखा आहे. या ब्रेन चाइल्ड साठी आणि सगळ्यांसाठीच आभारी आहे, ज्यांनी या गाण्याला एवढं मोठं बनवण्यात माझी मदत केली.” असं सांगत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

आरआरआरला क्रिटिक्स चॉईस अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले. एक म्हणेज, ‘RRR’ ला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड मिळाला. याशिवाय चित्रपटाला त्याच्या ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी’ समीक्षकांचा चॉईस पुरस्कारही मिळाला. 24 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत पाहायला मिळालेत. ‘नाटू नाटू’ हे गाणेही या दोन स्टार्सवर चित्रित करण्यात आलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रवीना टंडन होणार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, जाणून घ्या अभिनेत्रीच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से
अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा