Saturday, April 20, 2024

अभिमानस्पद! ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यानंतर दिग्दर्शक राजामौली यांनी व्यक्त केल्या भावना

अखेर ते झालेच! आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ९५ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याच्या विभागात नामांकन मिळाले आहे. या बातमीमुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली आहे. या नामांकनामुळे सर्वांमध्ये अतिशय गर्वाची भावना निर्माण झाली आहे. या सिनेमाच्या टिमसोबतच संपूर्ण देश आनंदात आहे. सिनेमाचे दिग्दर्शक असणाऱ्या एस एस राजामौली यांना देखील अमाप आनंद झाला असून, त्यांनी त्यांचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला असून, एक फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

एस एस राजामौली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त करताना लोकांना धन्यवाद म्हणत लिहिले, “बस मी आता अजून जास्त काहीच मागू शकत नाही. यावेळी मी तारक आणि चरण या दोघांच्या एनर्जीपेक्षा अधिक जास्त एनर्जी लावून ‘नाटू नाटू’ करत आहे. हे गाणे माल देण्यासाठी प्रेम मास्टर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. या गाण्यासाठी तुमचे योगदान खूपच कौतुकास्पद आहे. तुम्हाला माझा वैयक्तिक वयस्कर मी देत आहे. तारक आणि चरण याचे खास कारण तुमच्या दोघांची केमिस्ट्री आणि स्टाइलच आहे. तुम्ही दोघांनी तुमच्या डान्सने सर्वांचे मनं जिंकून घेतले आणि सॉरी तुम्हाला माझे टॉर्चर सहन करावे लागले. मात्र आता मी असे दुसऱ्यांदा करताना अजिबात मागे पुढे पाहणार नाही.”

तत्पूर्वी २०२२ या वर्षातला ‘आरआरआर’ हा सिनेमा आणि यातील ‘नाटू नाटू’ हे गाणे तुफान हिट झाले होते. आजही या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळते. या गाण्याला चार चाँद लावले ते तारक आणि चरण यांच्या डान्सने आणि केमिस्ट्रीने. या गाण्याला एमएम कीरावनी यांनी संगीत दिले असून गाण्याचे शब्द चंद्रबोस यांनी लिहिले आहे. तर विशाल मिश्रा आणि राहुल सिप्लीगंज यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध झाले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद

शाहरुखचा जुना फोटो पोस्ट करून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पाहा कसे दिले अभिनेत्याने चोख प्रत्युत्तर

हे देखील वाचा