एनसीबीसमोर रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा: बहिणीसोबतच मादक पदार्थांचे सेवन करायचा सुशांत सिंग राजपूत

Rhea Chakraborty statement to ncb about Sushant Singh Rajput drug case


बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मागच्या वर्षी १४ जूनला त्याच्या मुंबईमधील बांद्रा येथील घरात आत्महत्या केली. आता त्याची पहिली पुण्यतिथी देखील जवळ आली आहे. त्याच्या मृत्युने त्याच्या परिवारासोबत संपूर्ण चित्रपट सृष्टीला देखील मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या केसची हालचाल दिसायला लागली आहे. त्याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणात सातत्याने तपास चालू आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याला देखील पोलिसांनी अटक केले आहे. तो सुशांत सोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.

सुशांतच्या केससोबत अजुन बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. या दरम्यान ड्रग्स प्रकरणामध्ये सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला देखील अटक करण्यात आली होती. तिने पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. जे लिखित स्वरूपात आजही पोलिसांकडे आहे. रियाने सुशांत सिंग आणि त्याच्या परिवारबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

रियाने सांगितले की, “ज्या गोष्टींची माहिती दिली आहे, त्या सर्व गोष्टी डॉक्टर निकिता यांनी सांगितल्या होत्या. या गोष्टींचे साईड इफेक्ट काय होईल या बाबत देखील चर्चा झाली.” तिने पुढे सांगितले की, “सुशांत काही चांगले करत नव्हता. त्यामुळे त्याची अवस्था खूप खराब होत चालली होती. त्यामुळे शोविक खूप चिंतेत होता. मी आणि शोविकने गुगलवर क्लोमेनझेपेनचे साईड इफेक्ट काय असतात हे चेक केले. परंतु नंतर आम्हाला असे वाटले की, आम्हाला गुगल डॉक्टर नाही बनले पाहिजे.‌ मी ही गोष्टही सांगू इच्छिते की, ८ जून २०२० रोजी सुशांत सिंगची बहीण प्रियांका हीने त्याला व्हॉट्सअप वर एक मेसेज केला होता. या मेसेजमध्ये अनेक ड्रग्सच्या नावांचा उल्लेख होता.”

त्यांनतर रियाने सांगितले की, “मी विनंती करते की, तुम्ही कृपया या गोष्टीची नोंद घ्या की. या गोष्टीमुळे म्हणेजच ड्रग्समुळे सुशांतचा मृत्यू होऊ शकला असता, कारण ८ जून ते १२ जून दरम्यान त्याची बहीण मितू त्याच्यासोबत राहत होती. सुशांत हा १८ वर्षांपेक्षा मोठा होता, तो marijuana या ड्रग्सचे सेवन करत होता. मला भेटण्याच्या आधी पासूनच तो ड्रग घेत होता.” तसेच सुशांत हे जे काही करत होता, ते त्याच्या घरच्यांना माहित होते. त्याचे याबाबत त्याच्या घरच्यांशी बोलणे देखील होत होते, अशी माहिती रियाने दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.