Tuesday, July 9, 2024

रिया चक्रवर्ती ते भारती सिंग, जेव्हा ‘या’ प्रसिद्ध कलाकारांना एनसीबीने धरलेलं धारेवर

भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठी तसेच हिंदी भाषिक चित्रपटांमधील अनेक कलाकारांवर आतापर्यंत अमली पदार्थां प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी एनसीबीने केलेल्या छापेमारीमध्ये ९ पुरुष आणि ३ महिलांना ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टी एनसीबीच्या रडारवर आहे. या बातमीमधून जाणून घेऊयात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांना एनसीबीने कुठे व कशी अटक केली आहे.

अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गैब्रिएलाच्या भावाला नुकतेच एनसीबीने अटक केले आहे. अगिसिलाओस जवळ अमली पदार्थ सापडले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अगिसिलाओसला याप्रकरणी गोवा येथून पकडण्यात आले. गैब्रिएलाच्या भावाला या आधी देखील एनसीबीने अमली पदार्थांप्रकरणी अटक केली होती. (Reha Chakravarti to Bharti Singh list of bollywood celebs arrested NCB scanner in drugs)

हिना पांचाळ
नाशिकला एका पार्टीमध्ये एनसीबीची धाड पडली होती. त्यावेळी पार्टीमधून २२ लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिना पांचाळचे देखील नाव होते.

भारती सिंग – हर्ष लिंबाचिया
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने नोव्हेंबर २०२० मध्ये कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांच्या घरी धाड टाकली होती. यावेळी त्यांना त्यांच्या घरी काही अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्या कडून तब्बल ८६.५ ग्राम गांजा जप्त करण्यात आला होता.

रिया चक्रवर्ती
रिया चक्रवर्तीला अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या अमली पदार्थांप्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी तिची जामिनावर सुटका देखील झाली. सुशांतला अमली पदार्थ पूरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. यावेळी तिच्या भावाला देखील अटक करण्यात आली होती.

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

कपिल झावेरी
कपिल झावेरीला गोव्यातील त्याच्या निवास स्थानी अमली पदार्थांप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी तो त्याच्या गोव्यातील एका निवासस्थानी पार्टी करत होता. तेव्हा त्याच्याबरोबर आणखी २३ लोकांना देखील अटक करण्यात आली होती. कोरोना काळात सुरू असलेल्या या पार्टीमध्ये ९ लाखांहून अधिक नशिले पदार्थ जप्त केले होते. अभिनेत्याने ‘दिल परदेसी हो गया’ आणि ‘इश्क विश्क’ या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे.

अरमान कोहली
अरमान कोहलीला एनसीबीने त्याच्या निवासस्थानी अटक केली होती. त्याच्या घरामध्ये एनसीबीला अमली पदार्थ सापडले होते. त्यावेळी त्याने कोर्टात जामिनीचा अर्ज दिला होता. परंतु त्याची जामीन याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा