Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ऋचा चड्ढा दाखवली मुलीची पहिली झलक; सेलेब्रिटींनी केला प्रेमाचा वर्षाव

ऋचा चड्ढा दाखवली मुलीची पहिली झलक; सेलेब्रिटींनी केला प्रेमाचा वर्षाव

ऋचा चड्ढा (Rucha Chadda) हि हिंदी चित्रपटीतील अभिनेत्री आहे. तिने ‘ओये लकी’ या कॉमेडी चित्रपटातील छोट्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर तिला ‘ गँग्स ऑफ वासेपूर ‘ या सिनेमातून तिला प्रसिद्धी मिळाली. गोलियों की रासलीला राम-लीला, मसान, फुकरे या सिनेमांनी तिची कारकिर्द पुढे नेली आहे. तिने 16 जूलैला एका मुलीला जन्म दिला आणि तिने हि आनंदाची बातमी आपल्या सोशल मिडीया आकाउंट वरून सगळ्यांना दिली होती. त्यानंतर सगळे तिला अभिनंदन करत आहेत.

ऋचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या घरी एका लहान मुलीच आगमन झालं आहे. त्यांनी १६ जूलैला त्यांनी एका लहान मुलीला जन्म दिला. ते त्याच्या मुलीच्या येण्याने खूप खुश आहेत. त्यांनी नुकताच त्यांच्या मुलीचा पायाचा फोटो सोशल मिडीया हॅंडल इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यानंर बॉलीवुडच्या अनेक कलाकारांनी त्यांच अभिनंदन केलं. त्यात प्रियंका चोपडा, तब्बू आणि अनेक सेलेब्रिटींनी कमेंट सेक्शन मध्ये तिच्या मुलीसाठी प्रेम दाखवलं आहे.

ऋचा आणि अली फजलने या पोस्ट सोबत एक नोट सुद्धा शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहिले की, “आमच्या जीवनाच्या सगळ्यात मोठ्या कोलाबची घोषणा करण्यासाठी एक कोलाब पोस्ट करत आहोत,”आम्ही खरचं धन्य आहोत,आमची मुलगी आम्हाला आता व्यस्त ठेवणार आहे.त्यासाठी तुमचं प्रेम आणि आशिर्वादासाठी खूप खूप धन्यवाद.”

अली आणि ऋचा याच्या पोस्ट खाली अभिनेत्री तब्बूने लाल हार्टचा इमोजी टाकून ते आई बाबा झाल्याबद्दलच आपलं प्रेम व्यक्त केलं.जरीन खान हिने ‘मुबारक हो’ अशी कमेंट त्याखाली केली आहे.अभिनेत्री प्रियंका चोपडाने ‘बधाई’ या फोटो खाली कमेंट केली आहे.तापसी पन्नू हिने,’दोनों को ढ़ेर सारी बधाई, क्या दुआ पाई है’ अश्याप्रकारे त्यांचे अभिनंदन केले आहे.

ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनी २०२२ साली लग्न केलं होत.त्यांनी आई बाबा होणार असल्याची बातमीची घोषणा या वर्षाच्या सुरवातीला केली होती.ती संजय लीला भंसाली द्वारे दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ यात दिसली होती.दूसरी कडे अली फजल फुकरे ३ मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रभाससोबत पडद्यावर रोमान्स करणार ही पाकिस्तानी अभिनेत्री! हनु राघवपुडीच्या चित्रपटात मिळाली संधी
विक्की कौशलच्या ‘बॅड न्यूजसाठी ‘गूड न्यूज’, बॅाक्स ऑफिसवर 2 दिवसात केली तगडी कमाई

हे देखील वाचा