स्वदेशी ‘कू’ ऍपवर रिचा चड्ढाचा कडाडून विरोध, शेअर केला माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरचा व्हिडिओ


ट्विटरबाबत सतत होणाऱ्या विवादामुळे मोदी सरकारने ‘कू’ ऍप लाँच केले आहे. हे ऍप लाँच होताच सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. या ऍपला आता पर्यंत ३० लाख लोकांनी वापरायला सुरुवात केली आहे. स्वदेशी बनावटीचे हे ऍप ट्विटर सारखेच असल्याने जनतेचा या ऍपला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या ऍपच्या समर्थानात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आले आहेत, तर काही या ऍपला विरोध देखील करत आहेत.

अभिनेत्री रिचा चड्ढाने या ऍपला विरोध दर्शवला आहे. हा विरोध दर्शविताना तिने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला अनेक फॅन्स प्रतिक्रिया देखील देत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “मॉर्निंग Kukukukukukukukuku.” सोबतच तिने माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या बेटा सिनेमातील ‘कोयलसी तेरी बोली’ या गाण्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. तिच्या या मजेशीर ट्विटला नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील मजेशीर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा वादात अडकला होता.

हातात झाडू घेतलेल्या रिचाचे पोस्टर वादात अडकले होते. रिचाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मला जिवेमारण्याच्या धमक्या देखील दिल्या गेल्या, तर काहींनी माझी जीभ कापणाऱ्यावर बक्षीस देखील ठेवले होते.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.