Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड लग्नानंतर रिचा चड्ढानं घातलं ‘एवढ्या’ लाखांचं मंगळसूत्र; नेटकरी म्हणाले, ‘बुर्खा अन् हिजाब घाल’

लग्नानंतर रिचा चड्ढानं घातलं ‘एवढ्या’ लाखांचं मंगळसूत्र; नेटकरी म्हणाले, ‘बुर्खा अन् हिजाब घाल’

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा(Richa Chadha) आणि अली फजल(Ali fazal) हे 4 ऑक्टोबरला विवाह बंधनात अडकले. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थिती त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. हे जवळपासा दहा वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा आणि अली कायमचे एकमेकांचे बनले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण आता सर्वांचे लक्ष रिचाच्या मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधले आहे.

अलीकडेच या जोडप्याने मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शन दिले. यादरम्यान अभिनेत्री रिचाने लग्नानंतर तिचे सुंदर मंगळसूत्राच्या फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यूजर्स सोशल मीडियावर नेटकरी रिचा आणि अलीला जोरदार ट्रोल करत आहेत. काही नेटकऱ्यांनी या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत बुरखा आणि हिजाबचे टोमणे मारले आहे.

रिचाने लाखो रुपयांचे मंगळसूत्र घातले होते
रिचा चड्ढाने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत, फोटोंमध्ये रिचाने सुमारे 3 लाख किमतीचे बल्गारी ब्रँडचे मंगळसूत्र घातले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले, हा आठवडा आनंदाने भरलेला आहे. आम्ही जोरदार सेलिब्रेशन केला आणि यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मंगळसूत्र हे बल्गारी ब्रँडचे आहे, जे परिधान करून मला नवीन नवरीसारखे वाटते.

 

View this post on Instagram

 

ट्विटरवर #RichaChadha आणि #AliFazal हे ट्रेंड होत आहे. एकीकडे या जोडप्याचे चाहते त्यांचे उघडपणे अभिनंदन करत आहेत, तर दुसरीकडे ट्रोलर्सने या जोडप्यालात्यांच्या हिंदू-मुस्लिम लग्नासाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया यूजर्स ट्विटरवर याला लव्ह जिहाद म्हणत आहेत.

रिचा आणि अलीचे अभिनंदन करण्याऐवजी, नेटकऱ्यांनी ‘बुरका हिजाब मुबारक हो’ ट्रोल आणि शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.

 

रिचा आणि अलीने अडीच वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते आणि त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. दोघांचे लग्न झाले. रिचा आणि अलीच्या मेहेंदीपासून लग्नापर्यंत सर्व विधी दिल्लीत पार पडले. संगीत सोहळ्यात या जोडप्याने जोरदार डान्स सुद्धा केला. त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. तरीही या दोघांच्या लग्नाला लव्ह जिहादशी जोडत आहे.

 

एका नेटकऱ्यांने अली फजलवर मिर्झापूर संवादात बोलताना आरोप केला की, त्याने ऋचा चढ्ढाला फसवले आहे आणि लव्ह जिहाद केला आहे.

ऋतिक रोशन, सबा आझाद, विकी कौशल यांच्यासह अनेक कलाकारांनी मुंबईतील रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. ‘फुकरे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे कपल एकमेकांना डेट करत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेहनाजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वडीलांना धोका, अभिनेत्रीने स्वत:च केला धक्कादायक खुलासा

पाकिजा@४९: दिग्दर्शकाची पत्नीच अभिनेत्री, दोघांमधील वादामुळे १६वर्षे लांबला चित्रपट; शुटींग दरम्यान दारु पिऊन बेशुद्ध झालेली ‘मीनाकुमारी’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा