Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड केवळ पैसा कमावण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने केले होते चित्रपटात काम, ‘स्वदेस’ आणि ‘मुन्नाभाई’साठीही दिले होते ऑडिशन

केवळ पैसा कमावण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने केले होते चित्रपटात काम, ‘स्वदेस’ आणि ‘मुन्नाभाई’साठीही दिले होते ऑडिशन

बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. तिने ‘हंगाम’, ‘गोलमाल’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘गरम मसाला’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिची पात्र आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. पण त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काही खास काम नाही करू शकली. पण आता ती बॉलिवूडमध्ये पुन्हा येण्यासाठी मेहनत करत आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रिमीने सांगितले होते की, तिने अनेक मोठ्या चित्रपटाचे ऑडिशन दिले होते. अनेक चांगल्या प्रतिक्रिया येऊन देखील तिला त्या चित्रपटासाठी‌ नाकारले होते. तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, तिला केवळ पैशासाठी काम करावे लागत होते.

रिमीने सांगितले की, “मी माझ्या करिअरची सुरुवात म्युझिक अल्बम आणि गाण्यांपासून केली. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला हे काम करावे लागले होते. पैसे कमावण्यासाठी माझ्याकडे कोणतीच डिग्री नव्हती. मी एक क्लासिकल डान्सर आहे. त्यामुळे हावभाव माझ्या चेहऱ्यावर आपोआपच येतात. मी या व्यावसायाला नाही निवडले, तर या व्यावसायाने मला निवडले आहे. मला सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायला खूप आवडते. तसेच मला माझे नाव कमवायचे होते. मला काही दिवसांनंतर मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. त्यामुळे मी चित्रपटात काम केले. माझ्या आयुष्याचं ध्येय फक्त पैसे कमावणे एवढेच होते.”

रिमीने आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेश’ या चित्रपटासाठी देखील ऑडिशन दिले होते. तिने सांगितले होते की, “मी आशुतोषसोबत एका जाहिरातीमध्ये काम केले होते. त्यामुळे आमचे नाते खूप चांगले होते. त्यावेळी मी स्वदेश चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. पण त्यावेळी चित्रपटासाठी गायत्री जोशीला निवडले होते. या सोबतच मी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. मला सकारात्मक प्रतिसाद देखील आला होता पण त्यावेळी ग्रेसी सिंग हिला ते पात्र मिळाले होते. अशाप्रकारे माझ्या आयुष्यातील अनेक चित्रपटांच्या ऑफर गेल्या.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लखलखत्या बॉलिवूड दुनियेत ‘हे’ कलाकार पडले मागे, आपल्या वडिलांप्रमाणे होऊ शकले नाहीत यशस्वी

-हॉलिवूडवर शोककळा! ‘हॅरी पॉटर’मधील ‘या’ अभिनेत्याचे निधन, देेत होते गंभीर आजाराशी झुंज

-पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

हे देखील वाचा