Wednesday, July 2, 2025
Home अन्य ‘दुनियेत आलेला प्रत्येक जीव एकला असतो…’, रिंकू राजगुरूची पोस्ट बघून सोशल मीडियावर चर्चेला आलं उधाण

‘दुनियेत आलेला प्रत्येक जीव एकला असतो…’, रिंकू राजगुरूची पोस्ट बघून सोशल मीडियावर चर्चेला आलं उधाण

‘सैराट’ मधली आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. तिच्या पोस्ट्स दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता लॉकडाऊनमध्ये तर रिंकू अधिकच सक्रिय झाली आहे. दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र रिंकूने आता अशी पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून तिचे चाहते गोंधळात पडले आहेत.

खरं तर ही पोस्ट रिंकूने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे, जे पाहून चाहते थोडे चिंतेत आणि गोंधळात पडले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, रिंकूने असं काय पोस्ट केलं? तर रिंकूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे की, “या दुनियेत आलेला हर एक जीव एकला असतो.” रिंकूची ही पोस्ट पाहून आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. असे काय झाले, ज्यामुळे तिने अशी पोस्ट शेअर केली, हा प्रश्न चाहत्यांना सतावू लागला आहे.

Photo Courtesy Instagramiamrinkurajguru

अलीकडेच रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले होते, ज्यात रिंकू अतिशय फिट दिसत होती. यात तिचे टोन्ड फिगर सहजपणे पाहिले जाऊ शकत होते. रिंकूचे हे परिवर्तन पाहून, सर्वचजण चकित झाले होते. पूर्वीची रिंकू आणि आताची रिंकू यामध्ये आता खूप फरक जाणवायला लागला आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने काही दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा