Thursday, January 22, 2026
Home कॅलेंडर काय सांगता!! आपल्या रिंकूला डोळ्यांनी देखील ऐकू येतं? विश्वास नाही ना बसत, मग वाचा ही बातमी…

काय सांगता!! आपल्या रिंकूला डोळ्यांनी देखील ऐकू येतं? विश्वास नाही ना बसत, मग वाचा ही बातमी…

अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी आर्ची. सैराट चित्रपटाला येऊन बरेच वर्ष झाली, तरीही रिंकू आजही आर्ची म्हणूनच ओळखली जाते.

रिंकूने तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या अंदाजमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी नाव कोरले आहे. रिंकू नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या नेहमी संपर्कात असते. ती तिचे नवनवीन फोटो, व्हिडिओ, तिच्याशी संबंधित माहिती सतत शेयर करत असते.

रिंकूने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेयर केला आहे. तो फोटोतर सुंदर आहेच सोबत त्या फोटोला तिने दिलेले शीर्षकही खूप छान आहे. तिने लिहले आहे की, ‘मी माझ्या डोळ्यांनी खूप काळजीपूर्वक ऐकते.’

रिंकूच्या या नवीन फोटोला तिच्या फॅन्सकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे. सैराट चित्रपटाने रिंकूला जबरदस्त यश, प्रसिद्धी दिली. तिला सोशल मीडियावर लाखो लोकं फॉलो करतात.

काहीच दिवसांपूर्वी रिंकूचा अमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.या सिनेमात पाच लघुपट एकत्र होते. त्यातील रॅट ए टॅट या लघुपटात ती दिसली. शिवाय नुकतेच तिने ‘छूमंतर’ या सिनेमाचे लंडनमध्ये शूटिंग पूर्ण केले आहे. सोबतच ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ या सिनेमातही दिसणार आहे.

हे देखील वाचा