रिंकू राजगुरू म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी ‘आर्ची’ सैराट चित्रपटानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सैराटच्या अभूतपूर्व यशामुळे रातोरात रिंकूने महाराष्ट्राला वेड लावले. आपल्या पहिल्याच चित्रपटाने यशाच्या शिखरावर पोहचलेल्या रिंकूमध्ये आज सैराटच्या इतक्या वर्षानंतर खूप मोठा बदल झाला आहे. रिंकू सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे नवनवीन फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकतेच रिंकूने तिचे काही वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
रिंकूच्या या नव्या फोटोंमध्ये ती अतिशय वेगळी दिसत असून तिचे ‘फॅट टू फिट’ असे ट्रान्सफॉर्मशन झाले आहे. ती तिच्या या नव्या रूपात अतिशय ग्लॅमरस दिसत असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. तिच्या फोटोंना फॅन्सकडून लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे. रिंकूने २० किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे ती आता आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे.
रिंकूने २० किलो वजा कमी केले असले तरी तिने यासाठी कोणताही ट्रेनर लावला नव्हता. वजन कमी करण्यासाठी तिला तिच्या आईने मदत केली. रिंकूच्या आईने तिचे खाण्यापिण्याचे सर्व नियम पाळले. तिच्या आईने रिंकूच्या व्यायामाची देखील खूप काळजी घेतली. रिंकूने कोणत्याही डाएटिशियनशिवाय आणि ट्रेनरशिवाय दोनच महिन्यात वीस किलो वजन कमी केले आहे.
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रिंकूचा शेवटचा ‘मेकअप’ हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. शिवाय ती हॉटस्टारच्या ‘हंड्रेड’ या वेबसेरिजमध्ये सुद्धा दिसली. शिवाय तिचा अमेझॉन प्राईमवर नुकताच ‘अनपॉज्ड’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ‘ग्लिच’, ‘अपार्टमेंट’, ‘रॅट-ए-टॅट’, ‘विषाणू’ आणि ‘चाँद मुबारक’ या चार लघुपटांचा समावेश होता. यातील ‘रॅट ए टॅट’ या लघुपटात रिंकू राजगुरू दिसली.










