Wednesday, October 15, 2025
Home कॅलेंडर क्या बात! रिंकूची हिंदी सिनेसृष्टीत होणार दमदार एन्ट्री, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

क्या बात! रिंकूची हिंदी सिनेसृष्टीत होणार दमदार एन्ट्री, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी ‘आर्ची’. ‘सैराट’ चित्रपटाच्या यशामुळे एकरात्रीत स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. ‘आर्ची’ने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले ते कायमचेच. ही रिंकू आता हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच ती अमेझॉन प्राईमच्या एका सिनेमात दिसणार आहे.

‘सैराटच्या’ अकल्पनीय यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. रिंकू कधीच एकाच धाटणीच्या भूमिका न करता वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका करण्यावर भर देत असते. ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसिरीज नंतर रिंकू आता अमेझॉनच्या ‘अनपॉज’ या सिनेमात दिसणार आहे.

नुकताच रिंकूने या सिनेमाचा टिझर तिच्या सोशल अकाऊंटवरून शेयर केला आहे. ‘अनपॉज्ड’ या चित्रपटासाठी राज एंड डीके, निखिल अडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो हे पाच दिग्गज दिग्दर्शक एकत्र येऊन त्यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहेत. ‘अनपॉज’ या चित्रपटात पाच लघुपट एकत्रित करून हा एका सिनेमा करण्यात आला आहे.

 

‘अनपॉज्ड’ चित्रपट येत्या १८ डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार असून त्याच्या ‘ग्लिच’, ‘अपार्टमेंट’, ‘रॅट-ए-टॅट’, ‘विषाणू’ आणि ‘चाँद मुबारक’ लघुपटांचा समावेश आहे. यातील ‘रॅट ए टॅट’ या लघुपटात रिंकू राजगुरू पहायला मिळणार आहे. ‘रॅट-ए-टॅट’ चित्रपटाचे दिग्दर्शन लिलेट दुबे यांनी केले आहे. या चित्रपटात रिंकूसोबत तनिष्ठा चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची कथा रिंकूचे पात्र याबद्दल अधिक माहिती नसली तरी रिंकू तिच्या सकस अभिनयाने नक्कीच हिंदी प्रेक्षकांना ‘येडं’ लावणार यात शंका नाही.

रिंकू यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मेकअप’ या सिनेमात दिसली होती, शिवाय तिची हॉटस्टारवर ‘हंड्रेड’ नावाची वेबसिरीज देखील आली होती. रिंकू लवकरच समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ या सिनेमात दिसणार आहे. रिंकूने नुकतेच लंडन मध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात तिच्या सोबत प्रार्थना बेहेरे, ऋषी सक्सेना आणि सुव्रत जोशी दिसणार आहेत.

हे देखील वाचा