प्रेम हे आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. सिनेसृष्टीत यावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. काहींनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली तर काही चित्रपट मात्र दुर्लक्षित झाले. असेक्सच पुन्हा एकदा प्रेमाची आगळी वेगळी व्याख्या सांगणारा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू (rinku rajguru) ही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. रिंकू या आधी ‘सैराट’ (sairat) या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्या आर्ची या पात्राने खूप लोकप्रियता मिळवली.आता पुन्हा एकदा कृतिका बनून आपल्याला प्रेमाची नवीन भाषा शिकवायला कृतिका सज्ज झाली आहे.
रिंकूने तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव प्रेमाचा ‘रंग आठवा’ असे आहे. पोस्टरवर रिंकूचा एकटीलाच फोटो दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील गोड हसू सकारात्मक ऊर्जा पसरवताना दिसत आहे.
हा पोस्टर शेअर करून तिने लिहिले आहे की, “तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू… ‘कृतिका’च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!” त्यांचा हा चित्रपट येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. खुशबू सिन्हा ही या चित्रपटाची दिग्दर्शक आहे. तसेच समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कहाणी काही वेगळी असावी असा सगळेजण अंदाज लावत आहेत.
रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टरवर अनेकजण कमेंट करत आहेत. सगळेजण या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत, आर्चीला एका नव्या भूमिकेत सगळ्यांना पाहायचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-