×

रिंकू राजगुरूच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर दिलखुलास अदा, पाहून चाहतेही झाले फिदा

मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अगदी कमी वयात केली. काहींना लगेच यश मिळाले, तर काहींना त्या यशासाठी वाट पाहावी लागली. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूने वयाच्या १५ व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या एकाच चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवले. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

रिंकू (rinku rajguru) साधारण वेस्टर्नपासून ते पारंपारिक असे सगळे पोशाख परिधान करत असते. ती प्रत्येक लूकमध्ये खूप सुंदर दिसते. असाच तिने साडीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने आळशी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. कानात मोठे ईअरिंग घातले आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे लागले आहे. या गाण्यावर ती हावभाव देताना दिसत आहे. (Rinku rajguru’s video on shrivalli song viral on social media)

रिंकूने खूप कमी कालावधीत खूप मोठा चाहता वर्ग कमावला आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. तिच्या या व्हिडिओला देखील अनेकांना कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओमधील दिलखुलास अंदाज सगळ्यांना आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

 

Latest Post