×

‘गेहराइयां’च्या सेटवर दिग्दर्शकाने केला होता अनन्या पांडेचा चांगलाच ‘अपमान’, वाचा नेमकं काय झालं होतं!

दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या ‘गेहराइयां’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या चित्रपटाची नायिका असलेल्या अनन्या पांडेचा (Ananya Panday) मात्र शूटिंगदरम्यान शकून बत्रा यांनी चांगलाच अपमान केला होता, ज्याचा खुलासा खुद्द अनन्या पांडेने एका मुलाखतीत केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

शकुन बत्रा यांच्या ‘गेहराइयां’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची सध्या सर्वांना आतुरता लागली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), आणि धैर्य कारवा अशा कलाकारांनी अभिनेत्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सध्या हे सगळे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान अनन्या पांडेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, यामध्ये ती तिच्यासोबत घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाबद्दल बोलताना दिसत आहे. हा संपूर्ण किस्सा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. ज्यामध्ये अनन्या पांडेला एका सीनमध्ये तिने केलेल्या अभिनयासाठी दिग्दर्शक आपले खूप कौतुक करतील अशी अपेक्षा होती. मात्र असं न घडता सीन पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक तिच्यावर जोरजोरात हसू लागले होते, ज्यामूळे तिची चांगलीच फजिती झाल्याचं तिने सांगितलं. (gehraiyaan actress ananya pande reveals director shakun batra laugh on her face after crying scene)

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

नुकताच ‘गेहराइयां’ चित्रपटाच्या सगळ्या कलाकारांनी एक मुलाखत दिली होती. यावेळी अनन्याने हा सगळा प्रकार सांगितला. यावेळी ती म्हणाली की, “चित्रपटाच्या कथेमधील एका सीनसाठी मी खूप उत्साहित होते. मला असं वाटलं होतं की यामध्ये मी खूप उत्तम अभिनय करेन आणि दिग्दर्शक खूप आनंदीत होतील. यावेळी मी बाथरुममध्ये एकटी होते आणि कॅमेरा चालु होता. मला रडण्याचा अभिनय करायचा होता. मी विचार केला की, ज्यावेळी मी हा सीन पूर्ण करुन बाहेर जाईल, त्यावेळी माझं खूप कौतुक होईल. परंतु जेव्हा मी बाहेर आले, तेव्हा शकुन सर माझ्यावर जोरजोराने हसत होते. ते माझ्यासमोर हसत असल्याने मी खुपच गोंधळात पडले होते. मी काही चूकीचं केलं का? असही मी त्यांना त्यावेळी विचारले.”

या संपूर्ण प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देताना शकुन बत्रा यांनी सांगितले की, “मी भावूक सीन लिहायचो, मात्र त्याला बघू शकत नव्हतो. यावेळी मला हसू यायचं. म्हणून मी दुसरीकडे निघून जायचो.” त्यांना भिती वाटत होती की ते मध्येच हसायला लागतील आणि अनन्याच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. याबद्दल पूढे बोलताना ते म्हणाले की, “हा सीन जेव्हा मी हेडफोन लावून ऐकत होतो, तेव्हा तिच्या पोटातुन मला गडगडण्याचा आवाज येत होता. ज्यामुळे मला हसू आवरत नव्हतं.”

दरम्यान, हा चित्रपट ११ फेब्रूवारीला प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना सध्या जोरदार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

Latest Post