Monday, July 8, 2024

‘मुलगी तर मुलगी आता आई पण!’ रिषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीच्या आईने शेअर केली पोस्ट

भारतीय विकेट किपर रिषभ पंत याच्या अपघातानंतर तो गंभीर जखमी झाला होता. दिल्लीहून घरी जात असताना त्याचा गाडीचा भयंकर अपघात झाला होता. त्यामुळे त्याला देहरादून येथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. आता रिषभच्या प्रकृतीमध्ये सुधराणा होत आहे. रिषभच्या तब्येतीसाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत, तर दुसरीकडे उर्वशीच्या आईने देखिल रिषभची काळजी करत पोस्ट शेअर केली आहे. मात्र, नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टखाली मजेशीर कमेंट करत मज्जा घेतली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Ratutela) ही चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे आणि रिषभ पंत (Rishabh Pant)चे नाव एकत्र जोडले जाते. त्याशिवाय सतत यांच्या रिलेशनशिपवर संबंधित चर्चांना उधान येत असते. त्यामध्येच हे दोघेही एकमेकांना उद्देशून पोस्ट शेअर करत असतात. यांच्या वादामध्ये मात्र, ट्रोल करणाऱ्यांना चांगलीच संधी मिळत असते. रिषभचा अपघात झाल्यापसून उर्वशी सोशल मीडियावर काय पोस्ट करेल याच्याकडे सगळेटजन लक्ष केंद्रित करत आहेत . मात्र, या सगळ्यामध्ये मीरा रौतेला (Meera Rautela) यांनी बाजी मारली. उर्वशीची आई मीरा रौतेला यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

रिषभचा अपघात झाल्यानंतर मीरा रौतेला यांनी आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “सोशल मीडियावरील अफवा एका जबाजूला आणि तुझी तब्येत एका बाजूला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव प्रकाशमान करणे दुसऱ्या बाजूला. सिद्धबलिबाबा तुझ्यावर विशेष कृपा करो. तुम्ही सर्व देखील प्रार्थना करा.” असं त्यांनी लिहिलं आहे. मात्र, त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मीरा रौतेला यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

 

View this post on Instagram

 

मीरा रौतेला यांच्या पोस्टावर कही नेटकऱ्याने रिषभच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली आहे तर काहींना मीरा रौतेला यांच्या पोस्टवर गंमतीदार कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “सासू बाईंची प्रार्थना नेहमीच कामाला येते.” तर दुसऱ्याने लिहिले की, “जावईबापू लवकर बरे होतील तुम्ही काळजी नका करु.” तर एका अन्यने लिहिले, “मुलगी तर मुलगी आता आई पण.” रिषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशीने देखिल तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते ज्यावर प्रेक्षकांनी अशाच गंमतीशीर कमेंट केल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांधी गोडसे : एक युद्ध’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, चित्रपटात पाहायला मिळणार थरारक वैचारिक युद्ध
‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ

हे देखील वाचा