Monday, July 1, 2024

‘कांतारा’ला यश मिळत असतानाच ऋषभ शेट्टीने सिद्धिविनायकचे घेतले दर्शन

‘कंतारा’ने आपल्या दमदार कथानक, दृश्ये आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे. प्रेक्षक या चित्रपटातील सर्व घटकांवर प्रेम करत असतानाच, दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटाचा मुख्य अभिनेता असलेल्या रिषभ शेट्टी(Rishabh Shetty) यालाही भरभरून कौतुक करत आहे. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्यानंतर रिषभ शेट्टी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

ऋषभ शेट्टी त्याच्या टीमसोबत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला मंदिरात चाहत्यांची मोठी गर्दी दिसली. या भेटीत रिषभही पांढरा शर्ट आणि जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत होता. ‘कांतारा’ला मिळणाऱ्या यशासाठी रिषभ सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी आला असल्याचं सांगितलं जात आहे. तिथल्या काही चाहत्यांनाही त्याने थांबून फोटो काढू दिले. हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय होत असलेल्या ‘कंतारा’च्या लोकप्रियतेचे हे स्पष्ट द्योतक आहे.

याशिवाय, हा चित्रपट अलीकडेच आयएएमडीद्वारे प्रदर्शित झालेल्या भारतातील टॉप 250 चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांकावर होता. कांतारा हा एक परिपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट आहे आणि मनापासून बनवला आहे. ‘कंतारा’ सारखी महाकथा घेऊन साऊथ सिनेमा शिखरावर आहे.

जगभरात या चित्रपटाने २०० कोटीचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 30 सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येक दृष्टिकोनातून कौतुकास पात्र आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टायगर श्रॉफच्या पायाला जबर दुखापत; व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत

बिग बींसोबत लग्न करण्यासाठी जया बच्चनने ठेवली होती ‘ही’ अट, रिलेशनबाबतही केलं वक्तव्य

हे देखील वाचा