Saturday, June 29, 2024

आलिया भट्ट नाही, तर ‘ही’ व्यक्ती होती रणबीरच्या जोडीदाराच्या रूपात वडील ऋषी कपूर यांना पसंत

आपणा सर्वांना माहिती आहे की, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट रिलेशनशिपमध्ये आहेत. पूर्वी दोघे या विषयावर बोलणे टाळत असत आणि एकमेकांना चांगला मित्र म्हणून सांगत असत. पण आता रणबीरने सर्वांना आपल्या नात्याबद्दल सांगितले आहे.

लग्नाआधीच आलिया कपूर कुटुंबात मिसळली आहे. ती अनेकदा रणबीर कपूरच्या कुटूंबासोबत वेळ घालवताना पाहायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का? की ऋषी कपूर यांची इच्छा होती की, आलियाने नव्हे तर दुसऱ्या कोणीतरी रणबीरशी लग्न करावे. आज आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊया.

साल २०१८ मध्ये ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रणबीर कपूर त्याचा सर्वात चांगला मित्र आणि चित्रपट निर्माता अयान मुखर्जी सोबत दिसला होता. ऋषी कपूर यांनी त्यांचा फोटो शेअर करुन, रणबीरने आपल्या जिवलग मित्रासोबत लग्न करावे, असा सल्ला दिला होता. ऋषी कपूर यांनी फोटो शेअर करत लिहिले होते, “बेस्ट फ्रेंड! कसे होईल, जर तुम्ही दोघांनी आता लग्न केले तर? हाय टाईम.”

एकत्र केलंय काम
रणबीर कपूर आणि अयान मुखर्जीने ‘वेक अप सिड’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. अयानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि इथूनच दोघांची मैत्री देखील सुरू झाली होती. अयान आणि रणबीर दोघेही वाईट काळात एकमेकांना साथ देताना दिसतात. बर्‍याचदा दोघे एकत्र सुट्टीवरही जातात, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘वेक अप सिड’ नंतर आता दोघे ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात रणबीरसोबतच आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.

आलिया नेहमी देते रणबीरला साथ
आलिया भट्ट रणबीरसोबत त्याच्या कठीण काळात ठामपणे उभी राहते. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते, या दरम्यान आलिया भट्ट नेहमी प्रमाणे रणबीरसोबत दिसली. इतकेच नव्हे, तर ती रणबीरच्या कुटुंबाचीही खास काळजी घेत होती.

काही दिवसांपूर्वी रणबीर आलियासोबतच्या त्याच्या लग्नाबद्दल बोलला होता. तो म्हणाला होता की, जर कोरोना महामारी आली नसती, तर आतापर्यंत त्याचे आणि आलियाचे लग्न झाले असते. या मुलाखतीतच रणबीरने आलियासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सर्वांना सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा