Friday, July 5, 2024

रोमँटिक गाणं गुणगुणत एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले रितेश अन् जेनेलिया; थ्रोबॅक व्हिडिओ तूफान व्हायरल

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा ही बॉलिवूडमधली सर्वात लाडकी जोडी आहे. चाहते नेहमी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. हे दोघेही चाहत्यांना कधी निराश करत नाहीत आणि नियमित त्यांचे फोटो किंवा मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. शिवाय या जोडप्याच्या रोमँटिक व्हिडिओचा एक वेगळा चाहतावर्ग आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

रितेश देशमुखने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. वास्तविक हा एक थ्रोबॅक व्हिडिओ आहे, जो रितेशने त्याचा इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते दोघे बोटीत बसलेले दिसत आहे. सोबतच यात ते एकमेकांवर प्रेम व्यक्त करतानाही दिसले आहेत. यात तुम्ही पाहू शकता की, दोघेही ‘अकेले है तो क्या गम है’ हे गाणे गुणगुणत एकमेकांच्या प्रेमात हरवले आहेत.

या व्हिडिओद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या रोमँटिक बॉंडिंगची झलक पाहायला मिळाली आहे. नेहमीप्रमाणे रितेश आणि जेनेलियाच्या या व्हिडिओ चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. व्हिडिओ शेअर करत रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अकेले है तो क्या गम है. फॉरेव्हर लव्ह.” सोबत हा व्हिडिओ गोव्याचा असल्याचेही त्याने सांगितले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १.४ दशलक्ष युजर्सने पाहिला आहे. (riteish deshmukh and genelia dsouzes romantic video goes viral)

रितेश देशमुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच रितेश अखेरच्या वेळेस ‘बागी ३’मध्ये दिसला होता. त्याचवेळी जेनेलियाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘तुझे मेरी कसम से’ या चित्रपटामधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. यानंतर तिने तेलगू चित्रपटांमध्येही खूप ओळख मिळविली. बॉलिवूडमध्ये जेनेलिया डिसूझाने ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘मस्ती’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा